दमदार आमदार देवेंद्रदादा कोठे व युवा नगरसेवक श्री. प्रथमेशदादा कोठे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

आखाडा राजकारणाचा, डाव विकासाचा!

प्रलंबित प्रश्नांना गती देत सोलापूरच्या विकासाचा ‘विकासदूत’ म्हणून दमदार आमदार देवेंद्र कोठे यांची वाटचाल

सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.७ सप्टेंबर

राजकारणाच्या आखाड्यात सक्रिय राहताना विकासकामांना केंद्रस्थानी ठेवत सोलापूर शहरासाठी महत्त्वपूर्ण निर्णय आणि निधी मंजूर करून घेण्याच्या दिशेने आमदार देवेंद्र (दादा) कोठे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासोबतच शहराच्या पायाभूत सुविधांना बळकटी देणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनांना मंजुरी मिळवून देण्यावर त्यांनी भर दिला आहे.

सोलापूर शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न लक्षात घेता दररोज पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने १ हजार ३७८ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी मिळणे ही शहरासाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे. वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन या योजनेमुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला दीर्घकालीन बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

 

शिक्षण क्षेत्रातही सोलापूरला नवी दिशा देणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मंजुरीचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. उच्च शिक्षणासाठी स्थानिक विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.

 

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बी-२ (B2) प्रश्नावर तोडगा काढण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच सुमारे तीस वर्षांपासून प्रलंबित असलेला श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात आल्याने संबंधित समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

 

सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या ६८ लिंग परिसराच्या सुशोभीकरणासाठी ६ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याबरोबरच या परिसराच्या विकासाला यामुळे चालना मिळणार आहे.

 

शहराच्या औद्योगिक विकासालाही प्राधान्य देत एमआयडीसी परिसरातील रस्त्यांसाठी खास बाब म्हणून ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

 

पाणी, शिक्षण, पायाभूत सुविधा, धार्मिक वारसा, औद्योगिक विकास आणि वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न अशा विविध आघाड्यांवर कामांचा पाठपुरावा करत आमदार देवेंद्र कोठे यांनी विकासाचा अजेंडा पुढे नेला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते व नागरिकांकडून शुभेच्छा देताना, ‘आखाडा राजकारणाचा असला तरी डाव मात्र विकासाचा!’ अशी भावना व्यक्त होत आहे.

 

: विकासकामांचा ठळक आढावा

 

– १,३७८ कोटी रुपये — सोलापूरच्या दररोज पाणीपुरवठ्यासाठी मंजूर योजना

– शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय — मंजुरी मिळविण्यात यश

– B2 प्रश्न — अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास पुढाकार

– श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ — ३० वर्षांपासून प्रलंबित जागेचा प्रश्न सोडविला

– ६.८० कोटी रुपये — ६८ लिंग परिसराच्या सुशोभीकरणासाठी निधी

– ५६ कोटी रुपये — MIDC रस्त्यांसाठी खास बाब म्हणून निधी मंजूर

 

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

 

दमदार आमदार देवेंद्रदादा कोठे व युवा नगरसेवक श्री. प्रथमेशदादा कोठे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

 

शुभेच्छुक : विवेकानंद विद्यालय, कोंड्याल शिक्षण संकुल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *