नाट्यमय घडामोडीनंतर ८३ झेडपी विषय समिती सदस्यांची बिनविरोध निवड
शिष्टाईने शिवराज म्हेत्रे यांना शिक्षण समितीवर, तर प्रवीण तानवडे यांना अर्थ समितीवर संधी
सोलापूर व्हिजन,
सोलापूर, दि.१५ एप्रिल
सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्यांच्या निवडी बुधवार १५ एप्रिल रोजी मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर पार पाडल्या. समित्यांच्या सदस्य निवडीदरम्यान अक्कलकोट तालुक्यातील दोन सदस्यांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेला तणाव अखेर चर्चेतून निवळला असून, सर्व ८३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. या प्रक्रियेत शिवराज म्हेत्रे यांना शिक्षण समितीवर, तर प्रवीण तानवडे यांना अर्थ समितीवर संधी देण्यात आली.

दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विशेष सभेत विषय समित्यांसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. सकाळी दहा वाजता नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची वेळ देण्यात आली होती.
त्यानुसार विहित वेळेत ८३ सदस्यांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह अर्ज दाखल केले. त्यानंतर दुपारी दोन वाजता निवड प्रक्रिया पिठासीन अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या उपस्थितीत सुरू झाली. ठरलेल्या समीकरणानुसार भाजप व मित्रपक्षांच्या सदस्यांनी अर्ज भरले, मात्र अक्कलकोटमधील शिंदे गटाच्या शिवसेनेचे शिवराज म्हेत्रे व पंडित तानवडे यांची नावे यादीत नसल्याने त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत समाजकल्याण, शिक्षण, अर्थ व बांधकाम समित्यांसाठी अर्ज दाखल केले.
यामुळे बिनविरोध होणाऱ्या निवड प्रक्रियेत निवडणुकीची शक्यता निर्माण झाली आणि भाजपसमोर पेचप्रसंग उभा राहिला. परिणामी, सभा तहकूब करण्याची वेळ आली. त्यानंतर बालाजी सरोवर येथे वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नाराज सदस्यांची समजूत काढत त्यांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. या घडामोडींनंतर शिवराज म्हेत्रे व पंडित तानवडे यांनी माघार घेतली आणि दुपारी साडेतीन वाजता झालेल्या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पाटील यांनी सर्व सदस्य बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली.
पडद्यामागील राजकीय हालचालींनी घेतला वेग
विषय समित्यांच्या वाटपात भाजपने शिंदे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासह राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनाही संधी देत समतोल साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्वतःचे नाव वगळले गेल्याने म्हेत्रे व तानवडे यांनी थेट उमेदवारी अर्ज भरून दबाव तंत्राचा अवलंब केला.ही परिस्थिती गांभीर्याने घेत उपाध्यक्ष इंद्रजीत पवार व पक्षनेत्या रश्मी बागल यांनी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी समन्वय साधत दोन्ही नाराज सदस्यांना न्याय देण्याचा मार्ग काढण्यात आला आणि अखेर निवडणूक टळली.
निवडणूक झाली असती तर…’ चर्चांना उधाण
राजकीय वर्तुळात ‘निवडणूक झाली असती तर काय झाले असते?’ यावर चर्चा रंगली. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने म्हेत्रे व तानवडे यांचा विजय कठीण मानला जात होता. शिवाय निवडणूक प्रक्रिया राबविताना प्रशासनावर अनावश्यक ताण पडला असता आणि सत्ताधारी पक्षाची प्रतिमा धोक्यात आली असती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक टाळून सर्वांना न्याय देण्याचा मार्ग स्वीकारत भाजप नेतृत्वाने राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडविले, अशी चर्चा सध्या जिल्हा परिषद वर्तुळात रंगत आहे.
१० विशेष समिती यांचे सदस्य खालील प्रमाणे
स्थायी समिती सदस्य
१.माने पृथ्वीराज दिलीप
२.कल्याणशेट्टी शांभवी सचिन
३.देशमुख अदिनाथ नरहरी
४.बागल रश्मी दिगंबर
५.नरुटे बालाजी तुळशीराम
६.लवटे दादासाहेब भगवान
७.उंबरजे सविता महिंद्र
८.भांजे रमेश श्रीमंत
जलव्यस्थापन व स्वच्छता समिती सदस्य
१.शिवमुर्ती सिध्दाराम निलकंठ
२.साळुंखे गीताजंली हनुमंत (महिला)
३.काळे नंदकुमार दत्तात्रय
४.हिप्परगी रश्मी सागर
५.कोरके शनमुखी भारत
६.कांबळे वंदना शिवाजी
शिक्षण समिती सदस्य
१.जाधव चंद्रकांत ज्ञानेश्वर
२.बोधले सोनाली महेश
३.कांबळे वंदना शिवाजी
४.नारनवर सुषमा विष्णू
५.ताड दिपाली आनंद
६.भोरगुंडे श्रृती जेनसिध्द
७.डोंगरे विजयराज मनोहर
८.म्हेत्रे शिवराज सिध्दाराम
आरोग्य समिती सदस्य (सर्वसाधरण 8)
१.कडते सोनाली परसप्पा
२.दुधाळ संगीता हणमंत
३.टेळे संदीप अमृत
४.रोंगे मिनाक्षी मुरलीधर
५.खटकाळे शोभा बाबासो
६.भोसले नागनाथ पांडूरंग
७.कोकाटे सविता संज
८.भालके व्यंकटराव चंद्रकांत
अर्थ समिती सदस्य
१.तानवडे प्रविण दत्तात्रय
२.इंगवले पूनम सुदर्शन
३. डोके रेश्मा देवेंद्र
४.मोहिते-पाटील अर्जुनसिंह मदनसिंह
५.सावंत पृथ्वीराज शिवाजी
६.शिंदे लखन रमेश
७.चवरे चरण हणमंत
८.पांढरे केरप्पा महादेव
बांधकाम समिती सदस्य
१.बुळ्ळ्ळा विकास शिवसिध्द
२.नेताजीभाऊ गंगाधर खंडागळे
३.खांडेकर प्रदिप वसंत
४.जाधव सचिन बिराप्पा
५.चिवटे अश्विनी गणेश
६.ढेरे पूजा सचिन
७.पवार अतुल प्रभाकर
८.पाटील लक्ष्मीबाई (रविकांत) रतिकांत
महिला व बालकल्याण समिती सदस्य
१.डोईफोडे सुजाता धनाजी
२.शिवशरण करुणा जनार्धन
३.मुळे चेताली श्रीकांत
४.अंकुशराव दुर्गा गोपाळकृष्ण
५.सरतापे मिनाक्षी मिलिंद
६.तळेकर कल्याणी अजित
७.बागल मयुरी संतोष
८.दराडे भारती मदन
समाजकल्याण समिती सदस्य
१.सविता महेंद्र उंबरजे
२.शिवाणी महांतेश स्वामी
३.नंदकुमार कोडिंबा वाघमारे
४. तेजस्विनी अमोल बोराडे
५.सुप्रिया सुनिल गायकवाड
६.संगीता सोमा मोटे
७. विमल तानाजी खताळ
८. श्रुती गेनसिध्द भोरगुंडे
९ प्रशांत हणमंतराव पाटील
१०. करुणा जनार्धन शिवशरण
११.सिधुताई मोहन आलदर
कृषि समिती सदस्य
१.शिंदे लखन रमेश
२.आगावणे शुभम सुरेश
३.ढाणे आण्णासाहेब उर्फ संभाजी धोंडीबा
४.दराडे भारती मदन
५.लोंढे मारुती हरीदास
६.मोरे माधुरी तानाजी
७.दळवे आश्विनी योगेश
८. म्हेत्रे शिवराज सिध्दाराम
९. मगर दत्तात्रय रावसो
१०.देशमुख पंडित तुकाराम
पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सदस्य
१.वाघमारे नंदकुमार कोंडीबा
२.चौधरी अस्लम
गफूर
३.माने गौतम नामदेव
४.गोडसे रुपाली ज्ञानेश्वर
५.सावंत पृथ्वीराज शिवाजी
६.बुळ्ळा विकास शिवशिध्द
७.ठवरे निलावती मच्छिंद्र
८.गुळवे वनिता सुभाष