आमदारांची प्रेरणा घेऊनच हा विवाह सोहळा आयोजिला – पक्षनेते नरेंद्र काळे 

आमदारांची प्रेरणा घेऊनच हा विवाह सोहळा आयोजिला – पक्षनेते नरेंद्र काळे 

अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त १० जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आज

नरेंद्र काळे मित्र परिवाराचा उपक्रम; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

सोलापूर व्हिजन 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त नरेंद्र काळे मित्र परिवारातर्फे आज (गुरुवारी) जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० वाजता गोरज मुहूर्तावर अक्षता सोहळा पार पडणार असून या सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सांगितले की, या सामुदायिक विवाह सोहळ्यात एकूण १० जोडपी विवाहबंधनात अडकणार आहेत. दिवसभर पारंपरिक विधींनी विवाह सोहळे पार पडतील, तर सायंकाळी मुख्य अक्षता सोहळा उत्साहात होणार आहे.

या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे तसेच भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नवदांपत्यांना विविध संसारोपयोगी वस्तू देण्यात येणार आहेत. यामध्ये सफारी, शालू, मणी मंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट, भांडी तसेच पुस्तके यांचा समावेश आहे. नवविवाहित जोडप्यांची सायंकाळी जुळे सोलापूर परिसरातून पारंपरिक वरातही काढण्यात येणार असून या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.

सोबत येणाऱ्या वन्हाडी मंडळींसाठी सुग्रास भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या मंगल प्रसंगी नवदांपत्यांना आशीर्वाद देण्यासाठी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नरेंद्र काळे यांनी केले आहे.

 

माझे स्वतः चे लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात झाले. हीच भावना लक्षात घेऊन हा विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदारांची प्रेरणा घेऊनच हा विवाह सोहळा आयोजिला आहे. गरीबांपेक्षा श्रीमंतांनी यामध्ये समभाग घ्यावा. माझ्यानंतर १५ कार्यकर्त्यांनी लग्न झाले.

– नरेंद्र काळे, पक्षनेते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *