सोलापूरच्या पाणीप्रश्नाला मोठा दिलासा! १३७८ कोटींच्या योजनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचा कृतज्ञता सोहळ्यात सत्कार…

सोलापूर व्हिजन
सोलापूर : शहराला समतोल व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाकडून १३७८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्यानंतर सोलापूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार भाऊ गोरे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोलापूर आगमनानिमित्त भव्य विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन सोलापूर महानगरपालिकेचे महापौर श्री. विनायक रामकृष्ण कोंडयाल यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
सोलापूरच्या पाणीप्रश्नाच्या कायमस्वरूपी निवारणाच्या दिशेने उचललेले हे मोठे पाऊल मानले जात असून, या निर्णयामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.