शिक्षक भरतीची ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश ; सोलापूर जिल्ह्यातील ३१ हजार उमेदवारांना नोकरीची आशा
खाजगी आस्थापनास जिल्हा परिषद शाळा दिसणार पोर्टलवर अभियोग्यता धारकांचा प्रश्न मिटणार…
सोलापूर व्हिजन,
सोलापूर, दि.५ मे
राज्यात लवकरच शिक्षक भरती होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी ‘पवित्र पोर्टल’वर जाहिरात नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार १ ते ३१ मे या कालावधीत शाळांच्या व्यवस्थापनांना रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्याची मुदत शिक्षण विभागाने दिली आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा गेल्या वर्षी पार पडली. परीक्षेसाठी २ लाख २८ हजार उमेदवारांनी नोंदणी केली. तर २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यातील १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रे पूर्ण केली. मे २०२६ पर्यंत रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन भरती केली जाणार आहे.पहिली ते बारावीपर्यंतची रिक्त पदे भरणार १ली ते १२ वीच्या सर्व गटांमधील रिक्त पदांसाठी जाहिरात देता येईल. जाहिरात देण्यापूर्वी संस्थांना आपली बिंदूनामावली मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. रिक्त पदांची माहिती भरल्यानंतर ती संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी मान्यता दिल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नव्या शैक्षणिक वर्षात नवे शिक्षक विद्यार्थ्यांना मिळावेत म्हणून आझाद मैदानात आंदोलन मोर्चे काढले आणि वर्षभराची प्रतीक्षा संपली आणि पवित्र पोर्टल शिक्षकभरती नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. पहिली ते बारावीच्या सर्व आस्थापनानी पोर्टलवर नोंदणी करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ३१ हजार उमेदवारानी पवित्र पोर्टल ची परीक्षा दिलेले जवळपास ३१ हजार उमेदवारांना पेपर क्रमांक एक व दोन दिलेले आहेत. अशा उमेदवारांना न्याय कधी मिळणार किंवा त्यांना ह्या पवित्र पोर्टल वर शाळा उपलब्ध होतील म्हणून आशा लागून राहिलेली आहे.
– प्रशांत शिरगुर, राज्य उपाध्यक्ष स्पर्धा परीक्षा तथा पवित्र पोर्टल शिक्षक भरती.
नव्या शैक्षणिक वर्षात नवे शिक्षक विद्यार्थ्यांना मिळावेत म्हणून आझाद मैदानात आंदोलन मोर्चे काढले आणि वर्षभराची प्रतीक्षा संपली आणि पवित्र पोर्टल शिक्षकभरती नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. पहिली ते बारावीच्या सर्व आस्थापनानी पोर्टलवर नोंदणी करावे.
– प्रा.बालुशा माने, शिवयुनिटी फाउंडेशन