पंढरपूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची स्थापना  सात तालुके जोडले जाणार : मोहोळ तालुक्याची गैरसोय 

पंढरपूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची स्थापना

 सात तालुके जोडले जाणार : मोहोळ तालुक्याची गैरसोय 

सोलापूर व्हिजन,

राज्य शासनाने पंढरपूर येथे नव्याने मंजूर केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे .या कार्यालयाशी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा आणि मोहोळ या सात तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

मात्र पंढरपूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे मोहोळ तालुक्याला भौगोलिक व व्यापारीकदृष्टिकोनातून गैरसोयीचे ठरणार आहे.

पंढरपूर येथील नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा आणि मोहोळ या सात तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि बार्शी हे चार तालुके सोलापूर येथील विद्यमान प्रशासकीय कार्यक्षेत्रात राहणार आहेत.

या संदर्भातील प्राथमिक अधिसूचना २५ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. अधिसूचनेवर नागरिक, लोकप्रतिनिधी किंवा संबंधितांकडून काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या ९ जुलैपर्यंत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासन शाखेकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांची छाननी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाला १२ जुलैपर्यंत अंतिम अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर शासनाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय गैरसोयीचे : राजन पाटील 

पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी मोहोळ तालुका जोडण्यात आला आहे. मोहोळ तालुका सोलापूर शहरालगत आहे. तालुक्यातील नागरिकांना दैनंदिन व्यवहार शासकीय कामकाजासाठी सोलापूर हे सोयीचे आहे. तर पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे गैरसोयीचे आहेत. मोहोळ तालुका पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचे जोडण्यात येऊ नये अशी मागणी मागणीचे ठराव मोहोळ तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतीने केले आहेत. त्याबरोबरच अनगर नगरपालिकेने ही तसा ठराव केला आहे. भौगोलिक दृष्टिकोनाचा विचार करून मोहोळ तालुका सोलापूर येथील विद्यमान प्रशासकीय कार्यक्षेत्रात ठेवण्यात यावा यासाठी हरक घेण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन मोहोळ तालुका सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच राहावा अशी मागणी करण्यात येणार असल्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *