महात्मा फुले विद्यालयाची दहावीमध्ये उज्ज्वल कामगिरी;

महात्मा फुले विद्यालयाची दहावीमध्ये उज्ज्वल कामगिरी; ९२.४२ टक्के निकालाने यशाची परंपरा कायम

सोलापूर व्हिजन 

सोलापूर, दि. १२ मे :

सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ संचलित शाखा महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मंद्रूप येथील विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. सन २०२५-२६ च्या दहावी परीक्षेत प्रशालेचा निकाल तब्बल ९२.४२ टक्के लागला आहे.

सीसीटीव्हीच्या निगराणीखाली शांत, तणावमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला यश मिळाल्याने विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या निकालात श्रुतिका म्हेत्रे हिने ९३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. आयेशा मोमीन हिने ९०.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. तर सानिका कोरे आणि अमरिन शेख यांनी प्रत्येकी ९०.४० टक्के गुण मिळवत संयुक्त तृतीय क्रमांक मिळवला.

विशेष म्हणजे, प्रशालेतील २३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पी. एल. कोळी, उपाध्यक्ष संदेश कोळी, सचिव एम. डी. कमळे, उपाध्यक्ष डॉ. हवीनाळे, खजिनदार विठ्ठल पाटील, सहसचिव सुबोध कोळी, विश्वस्त नागेश बिराजदार तसेच मुख्याध्यापक कोळी शिवपुत्र आणि शालेय व्यवस्थापन समितीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रशांत शिरगुर यांच्या माध्यमातून शिक्षक आमदार जयंत आसगावकर तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *