मुख्यमंत्री देवाभाऊंच्या उपस्थितीत कृतज्ञता सोहळा ;
भाजपच्या ऐतिहासिक विजयानिमित्त सोलापुरात विजयी मेळावा !
विकासकामांच्या जोरावर जनतेचा विश्वास; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात भव्य सत्कार सोहळा

सोलापूर व्हिजन,
सोलापूर, दि.२७ एप्रिल
सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा आनंद साजरा करण्यासाठी शहरात भव्य विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याचबरोबर सोलापूरच्या विकासासाठी मोठे निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कृतज्ञता सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आयटी पार्क, १३७८ कोटी रुपयांची समतोल पाणीपुरवठा योजना,
एमआयडीसीतील सुविधांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी, अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी तसेच उजनी धरण परिसरातील प्रकल्पासाठी तब्बल १ लाख २८ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

हा भव्य कार्यक्रम मंगळवार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजता हरिभाई देवकरण प्रशाला मैदान, सोलापूर येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
स्वागतोत्सुक : आमदार देवेंद्र दादा कोठे तथा भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर-जिल्हा.