तरुणाईचा विश्वास, विकासाचा ध्यास; पृथ्वीराज (भैय्या) माने यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
सोलापूर व्हिजन वृत्तसेवा,
सोलापूर, दि.२६ जून
उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रथमच निवडणुकीत उभारल्यानंतर जिंकून आलेले तसेच तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. पृथ्वीराज (भैय्या) दिलीपराव माने (मालक) यांनी आपल्या कार्यकाळात विकासाभिमुख नेतृत्वाची वेगळी छाप पाडली आहे. आपल्या मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

कोंडी गटासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे, अंतर्गत मार्गांचे डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याच्या योजनांना गती, शाळांमधील आवश्यक सुविधा, अंगणवाडी इमारती, समाजमंदिरे तसेच विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावागावांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधला. विशेषतः आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवा याची वेळोवेळी माहिती घेतली. तसेच ज्या आरोग्य केंद्रांमध्ये औषधांसह कर्मचाऱ्यांची कमतरता जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी आरोग्य, शैक्षणिक सामाजिक आणि झेडपीच्या उत्पन्न वाढीसाठी अनेक मुद्दे उपस्थित केले.

युवक, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे आणि विकासकामांच्या अंमलबजावणीवर नियमित लक्ष ठेवणे, ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये राहिली आहेत.

जिल्हा परिषदेत विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत त्यांनी उत्तर सोलापूरच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अनेक विकासकामे मार्गी लावून ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळवून दिला.
सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. शैक्षणिक, आरोग्यविषयक, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. युवकांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेत विकास प्रक्रियेत त्यांची भूमिका अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

विकासाचा ध्यास, जनतेशी कायम संवाद आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने काम करण्याची भूमिका यामुळे पृथ्वीराज (भैय्या) माने यांनी उत्तर सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विश्वासार्ह नेतृत्व म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आगामी काळातही विकासकामांना अधिक गती देत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांसह नागरिक व्यक्त करत आहेत.