चाळी फ्रीहोल्डच्या श्रेयावरून भाजप-काँग्रेस आमने-सामने
सोलापुरातील वर्ग-२ च्या चाळी फ्रीहोल्ड
करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाच्या श्रेयावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाला.
सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.२१ जुलै
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला होता. काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांनी या निर्णयासाठी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खा. प्रणिती शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करून अभिनंदन ठरावात त्यांच्या नावांचा समावेश करण्याची मागणी केली. याला भाजपचे नगरसेवक अक्षय अंजीखाने यांनी विरोध केला. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असतानाही प्रश्न मार्गी लागला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर चेतन नरोटे यांनी प्रत्युत्तर देत दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक


वर्ग-२ च्या चाळी फ्रीहोल्ड म्हणजे काय?
राज्य शासनाच्या निर्णयानुसार वर्ग-२ स्वरूपातील चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर अधिक अधिकार मिळणार आहेत. फ्रीहोल्ड दर्जा मिळाल्यानंतर संबंधित मालमत्तेच्या हस्तांतरण, विक्री, वारसा नोंद, बँक कर्ज तसेच विकासासंदर्भातील अनेक कायदेशीर अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीमुळे सोलापूरमधील हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार असून, त्यांच्या मालमत्तेच्या मालकी हक्काला अधिक बळ मिळणार आहे. त्यामुळे हा निर्णय शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
चकमक झाली. सभागृहातील वातावरण तापल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी हस्तक्षेप करून वाद शांत केला. वर्ग-२ च्या चाळी फ्रीहोल्ड करण्याच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले, मात्र त्याच्या श्रेयावरून सभेत राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले.