जय जय रामकृष्ण हरीचा देशमुख वस्ती शाळेत घुमला जयघोष ; जिल्हा परिषद देशमुख वस्ती शाळेचा उपक्रम..
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १६ जुलै – आषाढी एकादशीनिमित्त मनपा देशमुख वस्ती जिल्हा परिषद शाळेच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिंडी मनली कि आठवते आपली विठाई, आठवते चंद्रभागा, आठवते पंढरपूर. वारकऱ्यांचा सण म्हणजे आषाढी एकादशी….
शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन पारंपारिक पोशाख धारण केला होता. मुलींनी काष्टा साडी तर मुलांनी कपाळी केशरी गंध, गळ्यात टाळ हातात भगवे झेंडे मुखात राम कृष्णाचे जयघोष करत दिंडीची सुरुवात झाली. मुलींनी डोक्यावर वृंदावन घेतले होते. यावेळी पालकांनी पालखीचे विठ्ठल रुक्माई चे जागोजागी आरती ओवाळून पूजन केले. तसेच फेर फुगडी विविध अभंग, भक्ती गीते यांचे गायन सादर केले. विद्यार्थ्यांनी नाम तुझे घेता देवा हे सामूहिक अभंग गायन केले. वस्तीमधील पालकांनी मुलांसाठी खाऊ वाटप केले.
दिंडी मधून साक्षरते विषयी सुद्धा जनजागृती करण्यात आली. सदरच्या दिंडीस पालक मोठ्या संख्येने उपस्थित होता. पालक वर्गातून मोठ्या प्रमाणामध्ये आनंद तसेच समाधान व्यक्त केला. सदरची दिंडी यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राहुल पाटील , सुधीर येनकीकर , सहशिक्षक संतोष सुतार , सत्यनारायण नडीमेटला यांचे सहकार्य लाभले. तसेच पालखीला आकर्षक फुलंची सजावट साखाराम घोरपडे यांनी केली आहे. यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर आणि पालकांचे सहकार्य लाभले.