समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांचा कास्ट्राईब संघटनेकडून सत्कार ; पुढील कार्यासाठी दिल्या शुभेच्छा
सोलापूर व्हिजन न्युज,
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांचा जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला.
समाजकल्याण क्षेत्रातील कामकाजाची दखल घेत सातपुते यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत सहकार्याचा विश्वास व्यक्त केला.यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष उमाकांत राजगुरू, मुख्य संघटक चंद्रकांत होळकर, संघटन सचिव रामदास गुरव, तसेच प्रशांत चाबुकस्वार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
