माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या बंगल्यावर शेतकरी संघटनेचा मोर्चा ; 

नऊ महिन्यांपासून ऊस बिल थकीत ठेवल्याने मांडला रस्त्यावर ठिय्या !

माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या बंगल्यावर शेतकऱ्यांचा ठिय्या

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि २९ जुलै – शेतकरी संघटनेच्या वतीने,सोमवारी कन्ना चौक येतील अक्कलकोटचे माजी आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मैत्री बंगल्यासमोर तुळजापूर आणि धाराशिव तसेच विविध गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन करत ठिय्या मांडला. शेतकरी संघटनेने अचानक हे आंदोलन करत बंगल्यासमोर ठिय्या मांडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.

           दरम्यान माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि चेअरमन शिवराज म्हेत्रे यांच्या साखर कारखान्यामध्ये  ऊस गाळपसाठी दिला होता. मात्र अद्यापही नऊ महिने उलटून देखील साखर कारखान्याचे चेअरमन यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपया देखील वर्ग केला नाही. त्यामुळे शेवटी शेतकरी वैतागून शंभर ते दोनशे किलोमीटर अंतर कापून सोलापूर शहरातील म्हेत्रे यांच्या बंगल्यासमोर शेतकरी संघटनेने ठिय्या मांडत आंदोलन केले. यावेळी धाराशिव, तुळजापूर आणि मराठवाड्यातील विविध गावातील असंख्य शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

      वारंवार मागणी करून देखील आमच्या उसाची थकीत बिले मिळत नाहीत असं म्हणत शेतकऱ्यांनी चक्क माजी आमदारांच्या घरासमोर आंदोलन केल्याने पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली. संबंधित रस्ता वाहतुकीसाठी काहीकाळ बंद ठेवण्यात आला होता.

        यावेळी शेतकरी संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सतीश बनसोडे , जिल्हा संघटक सुरज बचाटे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.

शेतकरी संघटना थकीत ऊस बिलासाठी आक्रमक….

माजी मंत्री आणि माजी आमदार असून देखील शेतकऱ्यांची बिले थकवली जातात. नऊ महिन्यांचा काळ उलटला तरी एक रुपया देखील चेअरमन आणि साखर कारखान्याच्या प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ ऊस बिले जमा केले नाही तर यापुढे उग्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना देत आहे. 

सतीश बनसोडे , शेतकरी संघटना अध्यक्ष धाराशिव जिल्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *