कामगारांना पेन्शन तर शहरवासीयांना दररोज पाणी देणार  !

कामगारांना पेन्शन तर शहरवासीयांना दररोज पाणी देणार  ! 

आडम मास्तरांचा २३ कलमी जाहीरनामा प्रसिद्ध …

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. ९ नोव्हेंबर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आज आपला २३ कलमी जाहीरनामा पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्ध केला आहे. मुख्यत्वे कामगारांच्या आणि नागरिकांच्या मूलभूत सोई सुविधांवर प्रकाशझोत टाकणारा आडम मास्तर यांचा हा जाहीरनामा आहे.

जाहीरनामा प्रसिद्ध करताना आडम मास्तर 

     दरम्यान माजी आमदार नरसय्या आडम (मास्तर) यांनी आपल्या जाहीरनाम्यात शहराचा सर्वांगी विकास, पाणीपुरवठा, झोपडपट्ट्यांचा विकास, युवकांना रोजगार, सार्वजनिक वितरण प्रणाली, आरोग्य वैद्यकीय सेवा, महिलांना व सामाजिक सुरक्षा, रे नगर वसाहत, गोदूताई परुळेकर नगर सुविधा उपलब्ध करणे, यंत्रमाग कामगारांसाठी सवलत, विडी कामगारांसाठी पेन्शन योजना, इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी पेन्शन व सेवानिवृत्ती, कंत्राटी कामगारांसाठी विविध योजना, संजय गांधी निराधार व लाडकी बहिण योजना, विजेचे खाजगीकरण करण्यास विरोध, मोची समाजाचे रहिवासी पुरावाची अट रद्द करणे, अल्पसंख्यांक समाजाकरता संरक्षण मिळणे, पद्मशाली समाजासाठी मार्कंडेय महामंडळाची स्थापना करणे, वडार समाजासाठी व्यवसायभिमुख योजना निर्माण करणे, सामाजिक आरक्षण बाबत पाठपुरावा करणे, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी सेटलमेंटमध्ये गृहनिर्माण निर्माण करणे, ऑटोरिक्षा व वाहन चालकांकडून वसूल केला जाणारा शुल्क कमी करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे अशा २३ कलमी जाहीरनाम्यातून आडम मास्तर यांनी आपले पुढील कार्याची दिशा ठरवली आहे.

        तदनंतर प्रजा नाट्य मंडळ कलापथक तेलंगणा व सोलापूर प्रचार जत्था यांच्याकडून पथनाट्य तसेच कलेच्या माध्यमातून आडम मास्तर यांच्या कार्याचे सादरीकरण करण्यात आले.

शेतकरी कामगार आणि जनतेच्या विकासासाठी जाहीरनामा. 

केंद्र आणि राज्य सरकारच्या जनविरोधी, शेतकरी आणि कामगार कर्मचारी विरोधी धोरणांचा पाडाव करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेत शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा आवाज जाणे आवश्यक आहे. शहरात केलेल्या अनेक कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी गरज असून हा पक्षाचा जाहीरनामा मांडत आहोत. 

नरसय्या आडम ( मास्तर ) , माजी आमदार तथा उमेदवार सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *