रे नगर च्या मेळाव्यात यंदा आडम मास्तरांना विधान सभेत पाठविण्याचा निर्धार….
रे नगर सभासदांना स्वयंरोजगार व त्यांच्या मुलांना रोजगार मिळवून देणार कॉ.आडम मास्तर यांची ग्वाही
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि.२८:-सोलापूरातील असंख्य बेघरांना हक्काचे घर देण्यासाठी आणि शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून सोलापूरातील ३० हजार असंघटीत कामगारांना पंतप्रधान आवास योजना शहर भाग अंतर्गत गृहनिर्माण प्रकल्प राबवून रे नगर च्या माध्यमातून सहकार तत्वावर परवडणाऱ्या दरात लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरे दि. १९ जानेवारी २०२४ रोजी देशाचे मा. पंतप्रधान दस्तुरखुद्द नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आले. हा सोलापूरच्या इतिहासात सुवर्णक्षण ठरला.
उर्वरित १५ हजार घरे ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वितरीत करण्याचे युद्धपातळीवर काम चालू आहे. रे नगर ही स्वतंत्र नगरपालिका होणार असून या नगरपालिकेत लागणारा मनुष्यबळ व कर्मचारी हे लाभार्थ्यांचे सुशिक्षित तरुण मुले असतील आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध स्वयंरोजगार योजनांद्वारे लाभार्थ्यांना स्वयंरोजगार मिळेल असे प्रयोजन तयार असून आगामी विधान सभेत भरघोस मताधिक्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला पाठवावे. असे भावनिक आवाहन रे नगर चे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केले.
रविवार कुर्बान हुसेन अल्पसंख्यांक महिला कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने सभासदांचा निर्धार मेळावा रे नगरचे चेअरमन कॉ. नलिनीताई कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी उपस्थित सभासदांमधून अनेकांनी स्वयंस्फूर्तीने मेळाव्यात व्यक्त झाले. एकंदरीत कॉ. आडम मास्तर यांना यंदाच्या विधान सभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी कटिबद्ध असून कोणत्याही राजकीय प्रलोभनांना, खोट्या आश्वासनांना आणि धार्मिक ध्रुवीकरणाला बळी न पडता प्रत्येक सभासद आपल्या कुटुंबियांसह अमुल्य मत कॉ. आडम मास्तर यांनाच देण्याचा वज्र निर्धार यावेळी करण्यात आला.
आगामी विधान सभेत रे नगरच्या सर्व सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध होण्याकरिता सभासदांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन केले व संस्थेच्या वतीने १ लाख रुपये निवडणूक निधी आडम मास्तर यांच्या हाती सुपूर्द केले.
.
यावेळी व्यासपीठावर सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख, रे नगरचे सेक्रेटरी कॉ. युसुफ शेख (मेजर), कॉ. व्यंकटेश कोंगारी, प्रा.अब्राहम कुमार, कॉ. रंगप्पा मरेड्डी, दाऊद शेख, विक्रम कलबुर्गी, लक्ष्मण माळी, नरेश दुगाणे, छगन कलबुर्गी, म.हनीफ सातखेड, असिफ पठाण, आदींची उपस्थिती होती. तत्पूर्वी या मेळाव्याची सुरुवात अब्दुल रसूल कुरबान हुसेन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या मेळाव्याचे प्रास्ताविक रे नगर फेडरेशनचे सेक्रेटरी कॉ. युसुफ शेख (मेजर) तर सूत्रसंचालन म.हनीफ सातखेड यांनी केले.
सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी जावेद सगरी, बजरंग गायकवाड, म.युसुफ शेख, राजेश काशीद, अमोल काशीद, अस्लम शेख, अमीन शेख, जुबेर सगरी, हुसेन शेख, अकिल शेख, नितीन कोळेकर, इब्राहीम मुल्ला, अमिना शेख आदींनीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने परिश्रम घेतले.