श्रमणाऱ्या हातांना हक्काच्या घरासोबत रोजगार मिळवून देणार – कॉ.नरसय्या आडम मास्तर ..!

श्रमणाऱ्या हातांना हक्काच्या घरासोबत रोजगार मिळवून देणार – कॉ.नरसय्या आडम मास्तरांचे जाहीर आश्वासन…

हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न….!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज, 

सोलापूर, दि.२२ सप्टेंबर – सोलापुरातील लढाऊ महिला कामगारांनी आपल्या हक्काचे घर मिळावे म्हणून गेल्या दहा वर्षांपासून अविरत संघर्ष केले. याच श्रमणाऱ्या हातांना महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण साठी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या आणि धोरणांच्या माध्यमातून अल्पसंख्याक महिलांना रोजगार मिळवून देण्याचा निर्धार ज्येष्ठ कमागर नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी केले.

 

 हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेविका कॉ. नलिनी कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी म्हणाल्या की, आपल्या सर्वांच्या डोक्यावर सावली आणण्यासाठी आडम मास्तर यांनी ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र आपल्यासाठी लढले, हक्काचे घर मिळवून दिले. श्रमिकाला मालक बनवणाऱ्या आडम मास्तरांना आमदार बनवणे हे आमचे कर्तव्य आहे , असे म्हणत सर्व उपस्थित सभासदांनी उत्स्फूर्तपणे हात उंचावून अब की बार आडम मास्तर आमदार , आडम मास्तर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या.

 

       यावेळी व्यापीठावर कामिनी आडम, संस्थेचे संचालक तस्लिम शेख, रुबिना शेख आदींची उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक गजेंद्र दंडी यांनी वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर केले. त्यास वार्षिक सर्वसाधारण सभेने एकमताने मंजूरी दिली. प्रास्ताविक संस्थेचे सचिव युसुफ शेख मेजर यांनी केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश काशीद,बजरंग गायकवाड,अमोल काशीद,दाऊद शेख,नरेश दुगाने,जावेद सगरी,विक्रम कलबुर्गी,प्रकाश कलबुर्गी,शाम आडम, जुबेर सगरी,हुसेन शेख, अमिना शेख,रहीम नदाफ, अमीन शेख, युसुफ शेख,अबू शेख, नितीन कोळेकर, हरिष पवार,प्रशांत चौगुले,गंगाराम निंबाळकर, नितीन गुंजे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *