नवरात्र महोत्सवात आल्या अनेक अडचणी !
माजी नगरसेविका रणरागिणी राजश्री अनिल चव्हाण आल्या धावून….. कार्यकाळ संपला तरीही दाखवली कार्यतत्परता..;
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ०४ ऑक्टोंबर – सध्या सोलापूर शहरात सर्वत्र नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. मात्र नवरात्र महोत्सवात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. जुळे सोलापूर भागातील प्रभाग 26 मध्ये विविध नागरी समस्या नागरिकांसाठी त्रासदायक ठरल्या होत्या.
ऐन सणासुदीमध्ये नवरात्र काळात नागरिक उपास करतात अनवाणी पायाने राहतात अशा देवी भक्तांना, खड्डेमय रस्ते आणि सर्वत्र पसरलेल्या चिखलाचे साम्राज्य यातून वाट काढावी लागत होती. सदरची व्यथा नागरिकांनी माजी नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण यांच्यासमोर मांडले असता त्यांनी लागलीच रस्त्यावर पडलेले खड्डे व पावसामुळे झालेले चिखलमय रस्ते ताबडतोब दुरुस्त करून त्यावर मुरुमीकरण रोलिंग करण्यात आले.
दरम्यान प्रभाग 26 मधील गुरुदेव दत्त नगर एक ते पाच, परमेश्वर नगर, अक्षय सोसायटी, बँक कॉलनी, उद्धव नगर ते रेणुका नगर येथील जवळपास पाच ते दहा नगराला जोडणारा रस्ता, रत्न मंजिरी नगर, राघवेंद्र नगर, राम नारायण चंडक विहार, ओम गर्जना चौक, रोहिणी नगर भाग एक,अशा अनेक नगरामध्ये पावसामुळे रस्ते चिखलमय झाले होते.
सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्याने तात्काळ सदर रस्ते दुरुस्त करावेत म्हणून झोन ५ कडील अधिकारी बाबर यांना आदेश दिल्याने तात्काळ जेसीपी टिपर उपलब्ध करून देऊन त्यावर मुरूम पसरवण्यात आला.
तसेच सदर ठिकाणी मुरूम टाकल्यानंतर नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी स्वखर्चाने रोलर बोलावून घेत त्याठिकाणी रोलिंग केल्याने स्थानिक नागरिकांना आणि देवीभक्तांना होणारा त्रास कमी झाला. तसेच आय एम एस कॉलेज ते शिवशक्ती रिक्षा स्टॉप बॉम्बे पार्क येथील स्ट्रीट लाईट गेल्या काही दिवसांपासून बंद होते. त्या समस्याचे निराकरण तात्काळ पूर्ण केले.
तसेच परमेश्वर नगर येथे ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे सांडपाणी सदर नगरात शिरल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती ही बाब सदर नगरातील सुजाण नागरिक विजय चव्हाण यांनी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सांगितल्यानंतर तात्काळ रोडीग मशीन आणून तेथील समस्या तात्काळ दूर केल्या.
राघवेंद्र नगर येथील महालक्ष्मी मंदिरा समोरील प्रवेशद्वारासमोरच महावितरणच्या इलेक्ट्रिक तारा जवळ असल्याने धोकादायक स्थितीत होत्या त्यासाठी एम.एस.सी.बी. विभागाला पाठपुरावा करून करून तेथील होणारा अनर्थ टळला व जलद गतीने तेथील समस्या दूर केल्या. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सांगेल तिथे आणि सांगेल तेव्हा काम करण्याची तत्परता दाखवल्याने
नागरिकांना नायक चित्रपटाप्रमाणे नगराची कामे होत असल्याचे सांगितले. चव्हाण ह्या निवडून आल्यापासून सतत नागरिकांच्या संपर्कात राहून अनेक नगराचा कायापालट केला आहे. तसेच त्यांचा नगरसेवकांचा कार्यकाल संपलेला असताना सुद्धा त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी धावून येतात व शासन दरबारी,सोलापूर महानगरपालिकेत सतत पाठपुरावा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना समस्या बाबतीत सांगितल्यानंतर तात्काळ आमची कामे होत असतात. ह्या कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर,रणरागिनी नगरसेविका आम्हाला अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.