आनंद दादांच्या प्रसंगावधानाने सर्वजण भारावले  ;  नेता हवा असा…!

आनंद दादांच्या प्रसंगावधानाने सर्वजण भारावले  ; 

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीतून शक्तीदेवीच्या रथाला वाट देत ओढला रथ….!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. १४ ऑक्टोंबर – सोलापूर शहरांमध्ये विजयादशमीनिमित्त एकीकडे दुर्गामाता आदिशक्ती मातेचा उत्सव तर दुसरीकडे भगवान गौतम बुद्धांचा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

यावेळी शहरातील रस्त्यांवर सण उत्सवाचे रंग मोठ्या उत्साहात उधळण्यात आले. दरम्यान प्रबुद्ध भारत मंडळाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य अशी लेझीम पथक मिरवणूक काढण्यात आली.

ही मिरवणूक मेकॅनिकी चौकात दाखल झाल्यानंतर, येथे विराजमान असलेले आई जगदंबेची पालखी मिरवणूक सुरू झाली होती. सर्वात जुने आणि मध्यवर्तीचे मंडळ असलेले शक्ती देवीची रथ मिरवणूक सुरू झाली होती. परंतु देवीसमोर समोर भव्य दिव्य असे लेझीम पथकाचे लेझीम पंत्रे सुरू होते.

         यावेळी प्रबुद्ध भारत मंडळाचे आधारस्तंभ तथा सर्वेसर्वा माजी गटनेता आनंद चंदनशिवे यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत, आपल्या कार्यकर्त्यांना बाजूला सरकावून देवी मातेच्या रथाला वाट दिली. तत्पूर्वी रथावर विराजमान असलेल्या देवी मातेचे दर्शन घेऊन दोरीच्या साह्याने रथ ओढून धार्मिक भावना जपली आणि सेवा रुजू केली. त्यामुळे सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरले.

यावेळी शक्तीदेवी मंडळाच्यावतीने आनंद चंदनशिवे यांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या माध्यमातून आनंद दादांना पुढील यशस्वी कार्यासाठी देवी मातेचा आशीर्वाद मिळाल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली.

 

आनंद दादांच्या प्रसंगावधानाने सर्वजण भारावले..

आनंद दादा यांनी लेझीम खेळता खेळता… देवी मातेचा रथ येत असल्याचे पाहिल्यानंतर तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांना बाजूला होण्याचा इशारा केला. संबळ, ढोल ताशांच्या गजरात देखील त्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने त्यांचे कौतुक केले. एवढ्यावरच न थांबता आनंदादा यांनी देवीचे दर्शन घेऊन दोरीच्या साह्याने रथ ओढून सेवा समर्पण भाव जपल्याने त्यांच्या प्रसंगावधानाने सर्वजण भारवल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *