सोलापूर महापालिकेच्या रोजंदारी आणि बदली कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज !
माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांचा यशस्वी पाठपुरावा…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१४ ऑक्टोंबर – सोलापूर महानगरपालिकेच्या रोजंदारी आणि बदली कर्मचाऱ्यांसाठी लवकरच खुशखबर मिळणार असून माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन यशस्वी पाठपुरावा केला आहे.आनंद चंदनशिवे हे आपले सहकारी माजी नगरसेवक गणेश पुजारी यांच्यासह सोमवारी सकाळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेऊन त्यांना महानगरपालिकेचा अतिशय महत्त्वाचा आणि कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सांगितला. यानंतर तेथे एक दोन दिवसात आचारसंहितेच्यापूर्वी हा निर्णय होईल, असे आश्वासन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान चंदनशिवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले की, सोलापूर महानगरपालिका मधील सन १९९५ नंतर सेवेत कार्यरत असलेल्या २४९ रोजंदारी व बदली कामगारांना सेवेत कायम करण्याच्यासोलापुर महानगरपालिकेमध्ये सुमारे गेल्या २५ ते ३० वर्षापासुन रोजंदारी व बदली या पदावर २४९ कामगार काम करीत आहेत. या कामगारांना अद्याप सेवेत कायम करण्यात आलेले नाही. सदरह कामगारांना सेवेत कायम करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने दि. ३१/०५/२०२२ रोजी नगर विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. या प्रस्तावास १६ महिने झालेले असुन या प्रस्तावावर आज पर्यंत कसलाही विचार झालेला नाही. त्यामुळे कामगारांवर हा एक प्रकारे फार मोठा अन्याय झालेला आहे. तरी या प्रस्तावास आपणाकडुन मान्यता देऊन सदर सेवकांना सो.म.पा. सेवेमध्ये कायम करणेबाबत आदेश करावे तसे मागणी केली.
सोलापूर महापालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर महापालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यासंबंधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २४९ रोजंदारीवर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.
– आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक तथा गटनेता.