सोलापुरात रंगणार कुस्तीचा फड ! सिद्धेश्वर आखाड्यात स्त्री-पुरुष पैलवानांची होणार कुस्ती… निर्झरा फाउंडेशनचा उपक्रम

निर्झरा केअर फाऊंडेशनतर्फे सिध्दाराम साखरे यांच्या स्मरणार्थ कुस्ती स्पर्धेचे आयोजन…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.५ जानेवारी 

श्रीश्रीश्री १००८ काशी जगद्‌गुरू मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामीजी, होटगी संस्थान मठ यांच्या शुभआशिर्वादाने निर्झरा केअर फाऊंडेशनच्या वतीने बोरामणी येथील कै. सिध्दाराम व्ही. साखरे यांच्या स्मरणार्थ दि. ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी च वाजता कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष स्वाती अळ्ळीमोरे साखरे यांनी दिली. श्री सिध्देश्वर आखाडा, किल्ला बाग, पार्क चौक, सोलापूर येथे सदरची कुस्ती स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, हिंदकेसरी डी.वाय.एस.पी. हिंद केसरी, सुनिल साळुंखे, बठाण महाराष्ट्र केसरी, पै.समाधान घोडके आदी मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. विशेष अतिथी म्हणून भाजपा महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, जलसंपदाचे माजी सचिव चन्नवीर बिराजदार, डॉ. शैलेश पाटील, शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे, उद्योजक नितीन बिज्जरगी, आय.आर.एस. मल्लिनाथ जेऊरे, सोलापूर कारागृह अधीक्षक प्रदीप बाबर, डबल उप महाराष्ट्र केसरी पै. मौलासाब शेख,  डबत उप महाराष्ट्र केसरी पै.सत्यवान घोडके, पै. पांडुरंग घोडके, पै. राजा देशपांडे, श्रीकृष्ण कुस्ती केंद्र संस्थापक पै. भरत मेकाले, निर्झरा केअर फाऊंडेशनच्या अध्यक्षा – स्वाती अळ्ळीमोरे (साखरे) आदी मान्यवर  उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अक्कलकोट दिलीप  सिध्दे  केदार विभूते, पै. मुन्ना शेख, चन्नु मटगे, सुरेश बाले,  राजकुमार हलसगे, पै. सोमनाथ पटणे, भारत कवडे,  प्रकाश आवटे, पंडीत मस्के,  मल्लू आवटे, सुभाष पाटील,  शिवा राठोड, सोलापूर शहर तालीम संघ अध्यक्ष रविकांत पाटील, शहर तालीम संघ वरीष्ठ उपाध्यक्ष पै. राजा देशपांडे,  पै. पांडुरंग चौगुले, पै. मोहन मस्के,  पुणे पोलीस सी. रईसा शेख ,अजित पाटील ,  जगन्नाथ व्यवहारे ,पापय्या तात्तीमचे केदारनाथ स्वामी, पै. सिद्राम वाकसे  सुभाष सुतार, सज्जीद्दीन आबादीराजे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

      

          दरम्यान, रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. यावेळी श्री सिध्देश्वर देवस्थान अध्यक्ष धर्मराज काडादी, हिंद केसरी (गंगावेस तालीम, कोल्हापूर) पै. दिनानाथ सिंह आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे. महिला कुस्तीगीरांच्या प्रेक्षणीय कुस्त्या रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी ४ ते ६ या वेळेत घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस सोमनाथ आळीमोरे भारत मेकाले गणेश पाटील आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *