महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंचा वाढदिनी ईच्छा भगवंताची परिवाराकडून सत्कार…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१७ मार्च
महाराष्ट्र राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आदिती तटकरे यांचा वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथील गीताबाग या निवासस्थानी मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा तसेच पुष्पहार घालून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान किसन जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका विभागातील लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळावा, यासाठी योजना यशस्वी राबविणाऱ्या आशा वर्कर्स यांचे मानधन काही दिवसापासून थकीत आहे ते मानधन लवकरात लवकर मिळावी. अशी मागणी केली. त्यावर आपण आशा वर्कर्स यांचा प्रलंबित मानधनाचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही यावेळी महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी किसन जाधव यांना दिली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात राबवा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. अशा सूचना देखील यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, सरचिटणीस संतोष गायकवाड हुडको, महादेव राठोड, दीपक आरगेल, आनंद गाडेकर यांच्यासह ईच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.