स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानास महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद -किसन जाधव

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानास महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद -किसन जाधव

प्र. २२ येथील रामवाडी मनपा आरोग्य केंद्रात महिलांसाठी विविध मोफत वैद्यकीय तपासणी….

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी 

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून तसेच महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं स्वस्थ नारी सशक्त परिवार या पंधरवाडा अभियानाचे आयोजन संपूर्ण राज्यभर करण्यात आले आहे. दरम्यान याच अभियानाचा एक भाग म्हणून सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथील रामवाडी आरोग्य केंद्र येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड,ईच्छा भगवंताची मित्र परिवार आणि सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या सहकार्याने महिलांसाठी विविध वैद्यकीय मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात रक्तदाब, मधुमेह, प्रसुतीपूर्व तपासणी, क्षयरोग, दंत तपासणी, अशा अन्य विविध तपासण्यांचा समावेश आहे.

 

तज्ञ डॉक्टरांकडून महिलांची तपासणी होऊन मोफत औषधोपचार देखील देण्यात आले महिलांच्या आरोग्याची तपासणी जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करणे तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार तर्फे महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी स्वस्थ नारी सशक्त नारी परिवार अभियानाचे आयोजन करण्यात आले असून या अभियानास प्रभाग क्रमांक २२ येथील महिला भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सदर अभियान राबविण्यात आला आहे असे यावेळी या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी किसन जाधव म्हणाले. प्रारंभी या अभियानाचे शुभारंभ सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, वैद्यकीय अधिकारी क्षिप्रा पिंजरकर, डॉ. प्रतीक्षा गायकवाड, डॉ. गीता गावडे, डॉ.वैशाली मसवेकर, डॉ. अंजली आवटे, डॉ. सुधा फडके, डॉ. पूजा शेंडगे, डॉ. श्रुतिका खडतरे, एएनएम रेखा गायकवाड, पुनम जाधव, वनमला शिंदे, विजया कांबळे, पूजा राठोड, स्वाती कोळी, स्वप्नाली मोरे, सरिता पावरा, ललिता पावरा, सरिता लोखंडे, निकिता जंगम, अश्विनी कोळी, विजय बोडू, क्षयरोग विभागाचे रुपेश गायकवाड, श्रीपाद नारायणकर यांच्यासह प्रभागातील महिला भगिनींच्या उपस्थितीत करण्यात आले. स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानास प्रभाग क्रमांक २२ मधून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *