Welcome 3 | अख्खं बॉलिवूड एकाच सिनेमात?

Welcome 3

Image Source

Welcome 3 : अक्षय कुमारच्या वाढदिवसाला Welcome To The Jungle (Welcome 3) हा नवीन चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र या चित्रपटात अक्षयकुमार बरोबर अख्खं बॉलिवूड तुम्हाला पाहायला मिळेल.

अक्षय कुमारचा Welcome To The Jungle हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसह एक Teaser प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये बॉलिवूड मधील बहुतांश कलाकार दिसत आहेत.

Welcome 3 ची घोषणा

Welcome 3 म्हणजेच Welcome To The Jungle चित्रपटात बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत. यामध्ये अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी, संजय दत्त, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, रवीना टंडन, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, जॉनी लीव्हर, तुषार कपूर आदींचा समावेश आहे. आणि या सर्वांच्या प्रदर्शित केलेल्या Welcome 3 च्या Teaser कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Welcome 3 Teaser👉🏻

यापूर्वी Welcome मध्ये नाना पाटेकर आणि अनिल कपूर या दोघांनी पहिले दोन भाग गाजवले आहेत. त्यांनी उदय आणि मजनू भाई उत्तम प्रकारे साकारले आहेत. त्यांनी केलेला अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. परंतु सध्याच्या Welcome To The Jungle च्या Teaser मध्ये नाना पाटेकर आणि अनिल कपूर दिसत नाहीत. यामुळे अनेक चाहते नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहेत. काहींना तर नाना पाटेकर आणि अनिल कपूर शिवाय Welcome 3 पूर्ण होऊ शकत नाही, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवसानिमित्त स्वतःला आणि त्याच्या चाहत्यांना खास भेट दिली आहे. Welcome सीरिजमधला हा पुढचा सिनेमा जंगलातील साहसावर आधारित असेल. हा चित्रपट डिसेंबर २०२४ मध्ये ख्रिसमसला प्रदर्शित होईल. चित्रपटात बरेच कलाकार आहेत, त्यामुळे तो पाहणे खरोखर मजेदार असेल.

Cast

Akshay Kumar Akshay Kumar
Sanjay Dutt Sanjay Dutt
Disha Patani Disha Patani
Jacqueline Fernandez Jacqueline Fernandez
Mukesh Tiwari Mukesh Tiwari
Suniel Shetty Suniel Shetty
Bobby Deol Bobby Deol
Paresh Rawal Paresh Rawal
Raveena Tandon Raveena Tandon
Lara Dutta Lara Dutta
Arshad Warsi Arshad Warsi
Rajpal Naurang Yadav Rajpal Naurang Yadav
Johny Lever Johny Lever
Rahul Dev Rahul Dev
Sharib Hashmi Sharib Hashmi
Tusshar Kapoor Tusshar Kapoor
Shreyas Talpade Shreyas Talpade
Yashpal Sharma Yashpal Sharma
Kiku Sharda Kiku Sharda
Krishna Abhishek Krishna Abhishek
Daler Mehndi Daler Mehndi
Mika Singh Mika Singh

हे ही वाचा

Jawan Trailer | ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’

Mahesh Bhatt On Jawan | महेश भट्ट यांच्याकडून किंग खानचे काैतुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *