घातक शस्त्राचा वापर नडला…सोलापूरातील सराईत गुन्हेगार आकाश मुदगलची येरवड्यात रवानगी…*

*सोलापूरातील सराईत गुन्हेगार आकाश मुदगलची येरवड्यात रवानगी…*घातक शस्त्राचा वापर नडला..

सोलापूर व्हिजन

सोलापूर दिनांक :- सोलापूर शहरातील सदर बझार, एमआयडीसी आणि जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, आकाश अनिल मुदगल, वय २८ वर्षे राहणार सिध्देश्वर हौसिंग सोसायटी, सिध्दार्थ चौक, सोलापूर हा मागील काही वर्षापासुन सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी बोरी, गैरकायद्याची मंडळी जमविणे, घातक शस्त्राने ईच्छापुर्वक दुखापत करणे, गैरपरिरोध करणे, दरोडा घालण्याची पुर्वतयारी करणे, घातक शस्त्रानीशी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द अश्या प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण ०६ गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. आकाश अनिल मुदगल याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याचे विरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत. आकाश अनिल मुदगल यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०१८ मध्ये क. १०७ फौ.प्र.सं अधिनियमानुसार, सन २०१९, २०२१ मध्ये क.५६ (१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये आणि सन २०२३ मध्ये क.३ एमपीडीए कायदा, १९८१ अन्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, मा.एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांनी, दि.१८/०६/२०२४ रोजी त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *