वंचितच्या संतोष पवारांना गावा-गावातून मिळतोय भरघोस प्रतिसाद !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.६ नोव्हेंबर – सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांचा पाकणी, शिवणी, हिरज, तिऱ्हेतांडा, बेलाटी, अकोले, पाथरी, डोणगाव, तेलगाव, तिऱ्हे, देगाव येथे प्रचारा निमित्त गावभेट दौरा संपन्न झाला.
गावा-गावातून उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळत आहे.आजच्या दिवसाची प्रचाराची सांगता तिऱ्हे येथे जनसन्मान सभा झाली. पवार यांनी सिंचनाचे क्षेत्र, तालुक्यासाठी स्वंतत्र एम.आय.डी.सी मंद्रूप तालुका निर्मिती व सरकारची विभागीय कार्यालये नाहीत.
अश्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आजवर तालुक्याचे प्रतिनिधित्व केलेल्या लोकप्रतिनिधींवर ताशेरे ओढले, तालुक्यातील प्रस्थापित नेते आणि घराणेशाहीला डावलून मला मिळणारा जनतेचा प्रतिसाद म्हणजे फक्त उमेदवाराला नव्हे, तर न्याय, समानता आणि तालुक्याच्या सर्वागीण विकासाच्या मार्गाला दिलेला जाहीर पाठिंबा आहे. एकजुटीच्या जोरावर,नवा आत्मविश्वास आणि समाजाच्या हक्कासाठी उभी राहणारी जनता या निवडणुकीत निश्चितच परिवर्तन घडवेल, असा विश्वास व्यक्त पवार यांनी जनसन्मान सभेत व्यक्त केला.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष विजयकुमार गायकवाड, शहराध्यक्ष प्रशांत गुनेवार, सोलापूर दक्षिण तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख, सह सचिव शिवाजी मंजरेकर ,जिल्हासंघटक उत्तम दिलपाक, सायरा शेख, आतिष बनसोडे, विक्रांत गायकवाड, असिफ यत्नाळ संतोष राठोड, अजय चव्हाण, अमोल कांबळे, किरण पवार, रोहित पवार, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, आदी उपस्थित होते.