विरांगणा राणी अवंतीबाई लोधी जयंती उत्सव अध्यक्षपदी श्री अर्जुन सोबुराम शिवसिंगवाले यांची निवड…

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर / प्रतिनिधी
लोधी समाजाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही विरांगना राणी अवंतीबाई लोधी यांची जयंती दि.१६ ऑगस्ट रोजी जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.लष्कर बेडर पुल येथे विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या भव्य प्रतिमेची स्थापना करण्यात येणार आहे.१८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बेडर पुल ते सिध्दार्थ चौक मौलाली चौक ते जगदंबा चौक ते बेडर पुल पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

विरांगणा राणी अवंतीबाई लोधी जयंती निमित्त बालाजी मंदिर लष्कर येथे रक्त दान शिबिर आयोजित करण्यात आला आहे.तसेच गरजु विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येणार आहे.अशी माहिती उत्सव अध्यक्ष श्री अर्जुन सोबुराम शिवसिंगवाले यांनी दिली. दरम्यान, विरांगणा राणी अवंतीबाई लोधी जयंती उत्सव निमित्त बालाजी मंदिर लष्कर येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.सदर रक्तदान शिबिरात ६४ रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच १६ ऑगस्ट रोजी जयंती उत्सव निमित्त गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अर्जुन शिवसिंगवाले यांनी सांगितले.

नूतन पदाधिकारी याप्रमाणे…
उपाध्यक्ष:- विकी कजाकवाले, अमोल भोसले कार्याध्यक्ष :-राहुल कैय्यावाले ,पवन कणकी, खजिनदार :-आदित्य मोरे, सागर संगे, सचिव शुभम मंनसावाले, करण कोलाकटी मिरवणूक प्रमुख:- अजय चौधरी, सनी वटवटवाले, दशरथ बत्तुल, राज फटबटवाले ,पवन म्हेत्रे ,करण कराडकर, गोविंद शाहीरवाले, नितीन कजाकवाले, विनायक म्हेत्रे संदीप चौधरी, रोहित गजले, नरेश पारखे, सुदर्शन आवटे, वीरांगणा राणी अवंतीबाई लोधी जयंती उत्सवानिमित्त बैठक व रक्तदान शिबिर साठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक भारतसिंग बडूरवाले ,माजी नगरसेवक रवीसिंग कैय्यावाले, लोधी समाज सामुदायिक विवाह समिती चे अध्यक्ष श्री नागनाथ शिवसिंगवाले ,कट्टर हिंदूत्ववादी श्री शिवराज गायकवाड, श्री समर्थ मोटे श्री दिनेश घोडके, परशुराम सतारेवाले, सनी मनसावाले हे उपस्थित होते.