अण्णा बनसोडे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला उजाळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर,भारतीय न्यायशास्त्रज्ञ,राजकारणी आणि समाजसुधारक !

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२८ नोव्हेंबर
सोलापूर दौऱ्यावर आलेले विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सायंकाळी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिलिंद नगर बुधवार पेठ येथील अस्थिविहारास भेट देत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, संविधान, सामाजिक समानता आणि शिक्षण यासारख्या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष,दलित आणि महिलांच्या हक्कासाठी केलेले कार्य तसेच बौद्ध धर्माचे तत्वज्ञान याबद्दल अण्णा बनसोडे यांनी विचार व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली, असे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार,भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळेच त्यांना ” आधुनिक भारताचे शिल्पकार ” म्हणून संबोधले जाते, असे विचारही अण्णा बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केले.
हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे आणि माजी उपमहापौर विष्णू निकंबे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर न्यू बुधवार पेठेतील चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन अण्णा बनसोडे यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा करत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर प्रभाग क्रमांक १, २ व ३ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या समोर न्यू बुधवार पेठेतील रस्त्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा आणि सुजित अवघडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना अण्णा बनसोडे यांनी आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अहोरात्र आणि एकजुटीने काम केल्यास यश निश्चित असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी जोमाला कामाला लागावे,असे आवाहन केले.
यावेळी सोलापूर शहर – जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,आनंद चंदनशिवे, महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, माजी नगरसेवक गणेश पुजारी यांच्यासह दशरथ कसबे, पिंटू ढावरे आदी मान्यवर उपस्थित होते.