शहर मध्यची जागा काँग्रेसला सुटल्यास आडम मास्तर यांनी काँग्रेसला सहकार्य करावे – चेतन नरोटे 

काँग्रेसने आगामी विधानसभेसाठी मागवली इच्छुकांची नावे 

शहर मध्यची जागा काँग्रेसला सुटल्यास आडम मास्तर यांनी काँग्रेसला सहकार्य करावे – चेतन नरोटे 

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि ८ जुलै – सोलापूर शहर जिल्ह्यातील आकरा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सादर करावेत असे आवाहन सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे , जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार यांनी केले आहे.

                       दरम्यान राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर- ऑक्टोंबर २०२४ मध्ये होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व अकरा विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२४ पर्यंत काँग्रेस भवन सोलापूर येथे जमा करावेत. त्याच प्रमाणे अधिक माहितीसाठी काँग्रेसचे मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार यांनी केले आहे.

                      दरम्यान लोकसभेप्रमाणे विधानसभेची निवडणूक नसणार, लोकसभेच्या निवडणुकीत अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन प्रचार केला गेला मात्र विधानसभेमध्ये असे चित्र दिसणार नाही. काही पक्षांनी प्रचारामध्ये जाणून बुजून खोडसळपणा केला. बोटाला शाही लावणे असे प्रकार घडले. परंतु त्यावर देखील काँग्रेसने मात केली. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील हेच चित्र कायम दिसेल मात्र आघाडीमध्ये सर्वांनी आघाडीचा धर्म पाळून पायात पाय घालण्यापेक्षा एकमेकांच्या हातात हात घेऊन काम केले पाहिजे, असा आशावाद शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी व्यक्त केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ मतदार संघासाठी  महाविकास आघाडी कडून इच्छुक उमेदवारांची यादी काढली जाणार आहेत. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत सोलापूर शहर मध्य विधानसभा जागा इतर पक्षाला सुटल्यास आम्ही सहकार्य करू. जर मध्याची जागा काँग्रेस पक्षाला सुटल्यास माजी आमदार आडम मास्तर यांनी आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसला सहकार्य करावे.

चेतन नरोटे, काँग्रेस शहराध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *