उप सभापती अण्णा बनसोडे यांच्या दालनात सोलापूरच्या प्रश्नांचा निपटारा
सोमवारी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी नागपूरला बोलावली बैठक

सर्वपक्षीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी यांना आमंत्रण !
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.५ डिसेंबर
विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सोलापूरच्या विविध समस्या व प्रश्नांची सोडवणूक संदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवार (दि.८ ) डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नागपूर येथे अण्णा बनसोडे यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.या बैठकीला सोलापूर शहरातील सर्वपक्षीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर संतोष पवार यांनी दिली.
विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी नुकताच तीन दिवसांचा सोलापूर दौरा केला आहे. या दौऱ्यामध्ये सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पिण्याचे पाणी, बेरोजगारी,आयटी पार्क, रस्ते, वीज तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आदींची निवेदने दिली होती. या निवेदनावर आपण लवकरच चर्चा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावणार असल्याचे सोलापूर दौऱ्यात त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, त्याच पार्श्वभूमीवर सोमवार ८ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता नागपूर येथे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव,जिल्हाधिकारी,महानगरपालिका आयुक्त, वीजवितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता,पोलीस आयुक्त,भूमी अभिलेख अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांना या बैठकीसाठी पत्र देण्यात आले आहे. मंत्रालयीन विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी संपूर्ण माहितीसह या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
या बैठकीसाठी सोलापूर शहर उत्तरचे आ. विजयकुमार देशमुख, शहर मध्येचे आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख , खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान जेष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे ज्येष्ठ नेते तौफिक शेख, गणेश पुजारी,आनंद मुस्तारे, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, ठाकरे सेनेचे शहराध्यक्ष महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण, कामगार नेते अशोक जानराव,माजी नगरसेवक बबलू गायकवाड,एमआयएमचे शहराध्यक्ष शौकत पठाण, माजी नगरसेविका सुनिता रोटे,उद्योजक तुकाराम गायकवाड, शशिकांत टाकळीकर,चेंबरचे अध्यक्ष राजू राठी, रिपाई आठवले गटाचे अतुल नागटिळक, रिपब्लिकन पार्टीचे नेते लखन भंडारे यांच्यासह माध्यमांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.
यावेळी शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक तौफिक शेख, महीला अध्यक्ष संगीता जोगदनकर, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे आदींची उपस्थिती होती.