स्वामींच्या वटवृक्ष पूजेसाठी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात महिलांची गर्दी

सोलापूर शहर जिल्ह्यात वट पौर्णिमा उत्साहात साजरी : स्वामींच्या दरबारात पहाटे पासून सुवासिनी महिलांची वडपूजनासाठी एकच गर्दी

सोलापूर व्हिजन

सोलापूर दी २१ जून –  सोलापूर शहरात वट पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकापासूनच महिलांची शहरातील विविध वटवृक्षास पूजा करण्यासाठी गर्दी दिसून आली. शहरातील अणप्पा कडादीं प्रशालेच्या मैदानावर असलेल्या भल्या मोठ्या वटवृक्षचे पूजन करून वडभोवती प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर महिलांनी एकमेंकाची ओटी भरली. यावेळी सारे वातावरण चैतन्यमय झाल्याचे चित्र दिसून आले.

स्वामींच्या वटवृक्ष पूजेसाठी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात महिलांची गर्दी..

दरम्यान अक्कलकोट शहरातील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात भक्तीभावाने पार पडला. सकाळी ८ वाजल्यापासूनच असंख्य सुवासिनी महिलांनी अपार श्रद्धेने वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाची वडपूजा करून हा सण साजरा केला. वटवृक्षाची पूजा करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो महिला दाखल झाल्या आहेत. दरम्यान, श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील साक्षात श्री स्वामी समर्थांचा सहवास लाभलेल्या वटवृक्षास धार्मिक व ऐतिहासिक महत्व असल्याने येथे दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी वडपुजेसाठी असंख्य महिला भक्त गर्दी करून वटसावित्रीने सुरु केलेली ही वडपूजा परंपरेप्रमाणे दरवर्षी स्वामींच्या दरबारी साजरी करतात. वडपूजा करण्यासाठी स्थानिक महिलांबरोबरच परगावाहून आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. वटपौर्णिमा असल्याने श्रींच्या दर्शनाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. पहाटे ५ वाजल्यापासूनच भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली होती. यावेळी भाविकांच्या दर्शनाकरिता मंदिर समितीच्या वतीने विशेष सोय करण्यात आली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *