वंचित निवडणुकीत घेतीय आघाडी !
संतोष पवार यांच्या समाजकार्याची मिळणार पोचपावती…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ नोव्हेंबर –
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजप पक्षाला टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्व ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आपल्या सामाजिक कार्याच्या शिदोरीवर संतोष पवार यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये वातावरण वंचितमय केल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे माध्यमातून पवार यांनी युवकांमध्ये एक वेगळी क्रेझ निर्माण केली आहे. गावात युवकांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत.
दरम्यान गावागावात प्रचार सभा घेऊन एक वेगळे वातावरण निर्माण केल्यांनतर शहरी भागात प्रत्येक कॉलनीत प्रचार सुरू केला आहे. शहरातील हद्दवाढ भागातील प्रत्येक नगरात कॉर्नर सभा, रॅली काढून सर्व परिसर पिंजून काढला जात आहे. संतोष पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रिया पवार यांनी देखील निवडणुकीत आघाडी घेत प्रचाराची धुरा सांभाळली आहे. एक नारी सब पे भारी या उक्ती प्रमाणे प्रिया पवार यांनी गावोगाव अन् शहरी भागात वंचित बहुजन आघाडी प्रचारात आघाडी घेत आहेत.
शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजप पक्षाला टक्कर देण्यासाठी वंचितने शहरात निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने मंद्रूप गावात आणि शहरी भागात तडफदार युवकांची फळी निर्माण करून प्रचार रणनिती आखली आहे. त्या अनुषंगाने सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघ वंचितमय केला जात आहे.