बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांची धडाडणार तोफ ; विरोधकांवर साधणार संधान..!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.७ नोव्हेंबर – सोलापूर सर्वच विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवार दुपारी ०३.३० वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा मागास सेवा मंडळ चंद्राम गुरुजी शिक्षण संकुल डीएड कॉलेज नेहरूनगर, विजापूर रोड, सोलापूर येथे संपन्न होणार आहे.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या जाहीर सभेतून सत्ताधारी तसेच विरोधकांचा समाचार घेणार आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखंबे आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संतोष पवार यांनी अधिक माहिती दिली.