आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही….
आरक्षण व संविधान पुसण्याचा प्रयत्न – डॉ. प्रकाश आंबेडकर
सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ संपन्न झाली सभा
प्रतिनिधी / सोलापूर व्हीजन न्यूज,
सोलापूर, दि.१० नोव्हेंबर – बटेंगे तो कटिंग एसे नवे वाक्यप्रचारात आणले जात आहे पण ओबीसी आरक्षण गेले तर काय होईल ? ओबीसींचे आरक्षण काढण्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. ओबीसी प्रचाराला गेले तर त्यांच्यावर हल्ले होत आहेत. त्याचा अर्थ दहशतवाद होत आहे. त्यामुळे कुठेतरी संविधानाचा आत्मा काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर शहरातील नेहरूनगर येथील शिवाजी अध्यापक विद्यालय मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत केले.
सोलापूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वंचितचे नेते रेखा ठाकूर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. आंबेडकर पुढे म्हणाले, राज्यात पाच ते सहा महिन्यात आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. आरक्षण वाचवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारांची यादी तपासा. सभागृहात ओबीसीचे प्रतिनिधित्व नसेल तर आरक्षण वाचेल कसे ? असा प्रश्न देखील यावर उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वंचित शिवाय आरक्षणासाठी पर्याय नाही असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आणि त्यांना विधानसभेत पाठवण्याचे आवाहन देखील यावेळी रेखा ठाकूर यांनी केले.
तदनंतर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनी देखील आपले मत व्यक्त करताना सत्ताधारी व विरोधकांवर टीकास्त्र सोडले. आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही.
बहुजनांच्या आधारासाठी वंचितला आधार द्या असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सोलापूर शहर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.