प्रकाश आंबेडकरांचा सनसनीखेज गोप्यस्फोट ; केले यांच्यावर गंभीर आरोप..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.९ नोव्हेंबर – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुरातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यासाठी सोलापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रकाशझोत टाकताना देशाचा सुरक्षेचा गंभीर विषय असल्याचे सांगितले.

दरम्यान १९९९ सालच्या जुन्या घडलेल्या घटनांवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले की, शरद पवार व दाऊद इब्राहिम यांची भेट होती. त्यानंतर बॉम्ब ब्लास्ट झाले असा मोठा गौप्यस्फोट करत पुढे १९९० ते २००० कालावधीत अनेक ठिकाणी ब्लास्ट झाले. आणि त्या भेटीचा काय संबंध आहे का? त्याची चौकशी झाली पाहिजे. आता तशीच परिस्थिती दिसत आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडायची नसेल तर ही चौकशी करा, अशी मागणी आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. माझ्या आरोपांचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तात्काळ करावा असे आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले.
ते पुढे म्हणाले, देशाच्या संरक्षणाचा विषय तुमच्या अजेंड्यावर कधीच नाही, तुम्हाला जात आणि धर्माच्या बाहेर जायचे नाही. केंद्रीय गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी बोरा कमिटीतील अहवालातील जोडपत्र का सभागृहासमोर आणले नाहीत याचे उत्तर त्यांनी द्यावे असे आव्हान दिले.
दरम्यान पाणी असूनही सोलापूर तहानलेली आहेत. मागच्या लोकसभेत मी उमेदवार होतो, त्यावेळी आठवडाभर पाण्यासाठी वाट बघत बसावं लागतं, पाच वर्षात निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनीने आहे तीच परिस्थिती ठेवली. इथल्या जनतेला ही परिस्थिती अपेक्षित आहे का असे दुर्दैवाने वाटते.वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलेंडर स्वीकारावे आणि जिल्ह्यात बदल घडवून आणावा असे आवाहन केले.
पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडवला तर लाडकी बहीण सारखी योजना आणण्याची गरज वाटत नाही असे ही ते म्हणाले. सोलापूर हे एक टेक्सटाइल हब आहे, याठिकाणी टेक्सटाइल कमिशनर ऑफिस आवश्यक आहे, टेक्सटाइल उद्योजकांनी मोदी प्रेम कमी केले तर या व्यावसायाची भरभराट होईल, असेही ते यावेळी म्हणाले.