ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाओ लोकशाही बचाव ;वंचित बहुजन आघाडीचे अभियान
महिमेद्वारे जिल्ह्यापातळीवर उभारणार जन आंदोलन….!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.३ डिसेंबर
राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पाडल्या. वास्तविक पाहता राज्यात महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण असताना, महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. यावरून ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन हटावचा नारा दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन सुरू केले असताना, आता वंचितने देखील ईव्हीएम मशीन विरोधात नवीन आघाडी उघडली आहे. ईव्हीएम मशीन विरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यभर दि. ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर रोजी पर्यंत ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आज महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गाव खेड्यातून ईव्हीएम हटाव च्या संदर्भात स्वाक्षरी घेऊन मोठे जनांदोलन उभारण्यात येणार असून जिल्ह्याच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला.
तत्पूर्वी विधानसभेमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात लढणाऱ्या वंचितच्या उमेदवारांचा सत्कार शहर व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला याप्रसंगी शहर व जिल्ह्याच्या सर्व युनिटच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होते, या बैठकीचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, महासचिव अनिरुद्ध वाघमारे, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता राजगुरू, सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, महासचिव विनोद इंगळे, कामगार संघटनेचे महासचिव सुरज आरखराव, सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष उपस्थित होते.
महिमेद्वारे जिल्ह्या पातळीवर उभारणार जन आंदोलन
ईव्हीएम मशीन विरोधात सोलापूर जिल्हा पातळीवर बैठक घेऊन मोठे जन आंदोलन उभारण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. जिल्हास्तरावर तालुका स्तरावर आणि गाव पातळीवर बैठक घेऊन यासंबंधी कामकाज केले जाणार आहे.
चंद्रशेखर मडीखांबे, वंचित जिल्हाध्यक्ष.