जिल्हास्तरीय १४ व १७ वर्षाखालील आंतरशालेय मुला-मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २० जुलै – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत जिल्हास्तरीय १४ व १७ वर्षाखालील आंतरशालेय मुला-मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धा अक्कलकोट रोडवरील पुंजाल क्रीडांगणावरील एसएसआयच्या बास्केटबाल मैदानावर शनिवार, दि. २० आणि रविवार, दि. २१ आयोजित करण्यात आल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि विद्या प्रतिष्ठान चे रमीज कारभारी, अब्दुल्ला चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.
यावेळी बास्केटबॉल प्रशिक्षक एम.शफि , नारायणकर , बाळासाहेब गायकवाड , ताबीश दोलाताबादकर अब्दुल्हा चौधरी , रमीज कारभारी अहमद मासुलदार यांचा पुष्पगुच्छ देऊन जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्पर्धेला मोठ्या संख्येने बास्केटबॉल खेळाडू संघानी सहभाग घेतला होता.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले , ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे , भास्कर आडकी, सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव , सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे , शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला , तनवीर गुलजार , महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर , कार्याध्यक्ष चित्रा कदम, महिला समन्वयक शशिकला कस्पटे, अध्यक्ष किरण माशाळकर , कांचन पवार संगीता गायकवाड शोभा गायकवाड आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.