शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, समाजसेवेचा अखंड ज्ञानयज्ञ – विठ्ठल वानकर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, समाजसेवेचा अखंड ज्ञानयज्ञ – विठ्ठल वानकर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदीनानिमित्त वंचितांना ब्लॅंकेटचे वाटप 

 

सोलापूर व्हिजन न्युज

सोलापूर प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण याची शिकवण दिली आहे. या शिकवणीला अनुसरून बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालावा ,यासाठी शिवसेना पक्ष वंचित ,निराधार व सामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी कायमच लढत राहणार असल्याचे सांगत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे समाजसेवेचा अखंड ज्ञानयज्ञ आहे,असे गौरवोद्गार , उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे सोलापूर शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांनी केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर शहर युवा सेनेच्यावतीने सोमवारी सकाळी सोलापुरातील श्री , सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वंचितांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले,यावेळी शहर प्रमुख वानकर बोलत होते.

सध्या थंडीचे दिवस आहेत. सोलापूरकर थंडीने कुडकुडत आहेत. शहरातील अनेक ठिकाणी वंचित लोक , महिला व लहान मुले उघड्यावर झोपलेले असतात.त्यांच्या अंगावर थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे गरम कपडे किंवा रात्री झोपताना चादर व अन्य कपडे नसतात. त्यामुळे युवा सेनेच्यावतीने अशा १०० हुन अधिक वंचितांना युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या हस्ते

ब्लँकेट वाटप करण्यात आले. ब्लॅंकेट वाटप केलेल्या वंचितांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता.

यावेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक सुमित साळुंखे,शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे,विभाग प्रमुख अरुण जाधव,अमर गुंड ,अर्जुन गायकवाड ,सागर जाधव, राहुल आवताडे, विष्णू जगताप, राजू बुरबुरे, संतोष कोरे, संदीप काशीद, अरविंद गवळी, साई जाधव, अनिल शिंदे यांच्यासह युवा सेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

शिवसेना, समाजाच्या विकासासाठी निर्माण झालेले संस्कार केंद्र 

सामान्यातील सामान्य माणसाचा विकास आणि लोकांच्या सक्षमीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वंचित घटकांना मदत करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सोलापूर शहर युवा सेनेच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून शहर आणि परिसरामध्ये सामाजिक कार्य मोठ्या जोमाने सुरू आहे. वर्षभर विविध प्रकारच्या सामाजिक सेवाच्या माध्यमातून युवासेनेचे कार्य सुरूच असते. शिवसेना म्हणजे समाजाच्या विकासासाठी निर्माण झालेले एक संस्कार केंद्र आहे.याच संस्कार केंद्राच्या माध्यमातून व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आचरणानुसार युवा सेनेच्यावतीने वर्षभर सामाजिक कार्याचा ज्ञानयज्ञ चालविला जातो. तो अखंडपणे सुरू राहणार आहे.

विठ्ठल वानकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना शहर प्रमुख, सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *