उद्धवसेनेने मंत्री भारत गोगावले यांच्या प्रतिमेस मारले जोडे…
महिला आघाडीने दाखवल्या बांगड्या : शिंदेसेनेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१६ जून
माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे गटाचे मंत्री भारत गोगावले यांनी अआक्षेपार्ह विधान करत शिवसेना फुटीला रश्मी ठाकरेच कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर जिल्हा शिवसेना आणि महिला आघाडीच्या वतीने सात रस्ता येथे तीव्र धरणे आंदोलन केले. यावेळी गोगावले यांच्या प्रतिमेत जोडोमार आंदोलन केले महिला आघाडीच्या वतीने गोगावले यांना बांगड्यांचा आहेर भेट दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे रश्मी ठाकरे यांच्यामुळे झाला आहे. रश्मी ठाकरे शिवसेना फुटीस कारणीभूत असल्याचा खळबळजनक आरोप शिंदेसेना गटाचे रोजगार मंत्री भारत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली आहे. मंत्री भारत गोगावले यांच्या विरोधात उबठा सेनेच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरांमध्ये सोलापूर शिवसेना शहर शाखेच्या वतीने आणि महिला आघाडीच्या वतीने सात रस्ता येथे आंदोलन तीव्र आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी भरत गोगावले यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात उपनेते अस्मिता गायकवाड शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील, रविकांत कांबळे, खंडू सलगरकर, शिवा माळी, इलियास शेख, सत्तार शेख, कबीर शेख, संतोष घोडके, महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
रश्मी ठाकरे या शिवसैनिकांच्या अस्मिता आहेत भारत गोगावले यांनी ठाकरे यांचा अवमान करून संबंध महिला वर्गाचा अवमान केला आहे. यापुढे भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बाबत बेताल वक्तव्य केल्यास गोगावले दिसतील, त्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी जाऊन तोंडाला काळे फासू .
संतोष पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख