जय ग्रुपतर्फे पावसाळ्यात लावणार २०० झाडे : पर्यावरण संवर्धनासाठी कौतुकास्पद पुढाकार
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि 22 जून – जय ग्रुपतर्फे सलग सहाव्यावर्षी सोलापुरात वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ झाला. यंदाच्या पावसाळ्यात सोलापूर पूर्व भागात २०० झाडे लावण्यात येणार असून त्याची सुरुवात शुक्रवारी कर्णिक नगर येथे करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला.
सोलापुरातील झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. परिणामी सोलापूरचे तापमान दरवर्षी वाढत चालले आहे. त्यामुळे उत्तम पर्यावरणासाठी सोलापूरमध्ये अधिकाधिक झाडे लावण्याची गरज निर्माण झाली आहे. ही गरज ओळखून जय ग्रुपतर्फे गेल्या सहा वर्षांपासून दर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येते. यंदाच्या पावसाळ्यात २०० झाडे लावण्यात येणार आहेत, असे जय ग्रुपचे प्रमुख जयंत होले – पाटील यांनी सांगितले.सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक नागेश वल्याळ, नगरसेवक संतोष भोसले, उपायुक्त संदीप कारंजे, श्रीधर आरगोंडा, जय ग्रुपचे जयंत होले – पाटील, डॉ. श्वेता होले – पाटील, श्रीधर पुलगम, चंद्रकांत मगर व सर्व कर्मचारी सोलापूर क्रेडाईचे अध्यक्ष अभय सुराणा, सचिव संतोष सुरवसे, क्रेडाई वुमन्स विंगच्या सुराणा, पावन गणपती मंडळ आणि योगा संघटनेचे माजी उपमहापौर प्रविण डोंगरे, डॉ. शिलवंत इरकल, मकरंद जाधव, बसवराज विजापुरे, विक्रांत खुणे, अनिल सुगंधी, अतुल धुमाळ, मलकप्पा बणजगोळे, नाना जानकर, पांडेकर, रवि जावळे, शंभूलिंग वाले, प्रकाश लोणी, राहुल उपाध्ये, दत्ता माने, जय इरकल, मल्लिकार्जुन थंबद, संदीप पाटील, रवि पाटील, अनिल धुमाळ, अश्विन पवार, रावसाहेब वांजरे, हडळगी, संजय भिसे, बसवराज चलगेरी, हरी कुंनगुळवार, संदीप बिराजदार, दीपक घाडगे आदी उपस्थित होते.
उन्हाळ्यात देतात टँकरने पाणी
जय ग्रुपतर्फे वृक्षारोपण करण्यात आल्यानंतर प्रत्येक झाडाला ट्री गार्ड लावून त्या झाडांची कायमस्वरूपी काळजीही घेतली जाते. वाढत्या उन्हामुळे झाडे नष्ट होण्याचा धोका लक्षात घेऊन उन्हाळ्यात स्वखर्चाने टँकरने त्या झाडांना पाणी देण्याचे काम जय ग्रुपचे प्रमुख जयंत होले – पाटील केल्या ६ वर्षांपासून करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.