तब्बल पाच पिढ्यांचा ‘साक्षीदार’ असलेल्या झाडावर कुऱ्हाड…Tree cutting Kasegaon road at South solapur tahsil 

तब्बल पाच पिढ्यांचा ‘साक्षीदार’ असलेल्या झाडावर कुऱ्हाड…

ग्रामस्थांमधून व्यक्त केली जातीय नाराजी … Tree cutting Kasegaon road at South solapur tahsil 

सोलापूर व्हिजन 

सोलापूर ५ ऑगस्ट – दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगांव-कासेगांव रस्त्यावरील महावितरण नवीन तारा ओढण्याच्या कामात कासेगांव रस्त्यावरील लिंबाच्या २०-२५ झाडांवर कुऱ्हाड चालवलीय. त्यातच गुरवांचं लवण अशी ख्याती असलेल्या रस्त्याच्याकडेला नाल्याजवळील ५ पिढ्यांचा साक्षीदार असलेल्या वडाच्या झाडावर कटर चालवून त्यास ‘ बोडकं ‘ करण्यात आले आहे.

             दरम्यान पर्यावरण संतुलनासाठी ‘झाडं लावा, झाडं जगवा’ हा संदेश जनमाणसांना देण्यासाठी शासन लाखो रुपयांचा चुराडा करते. त्यानंतर अशी सर्रासपणे वृक्षांची कत्तल चालवली जात आहे. गेल्या पाच पिढ्यांचा साक्षीदार असणारे हे भलमोठे वटवृक्ष आज जमीनदोस्त केले जात असल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. कालपर्यंत हिरव्या गर्द पानांनी बहारलेल्या झाडाची तीचं पानं उद्या पाचोळ्यात पडलेली दिसणार आहेत.

             तब्बल ५ पिढ्याचा मूक साक्षीदार असलेलं वडाचं झाडं विनापरवाना कापलं गेलं असल्यास जिल्हा प्रशासनानं स्वतः तक्रारदार होऊन मनमानी कारभार केलेल्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *