तौफिक शेख यांनी केले शक्तीप्रदर्शन ; जयंत पाटलांसमोर उभा राहिला प्रश्न  शहर मध्य मतदार संघासाठी निर्माण झाला पेच

तौफिक शेख यांनी केले शक्तीप्रदर्शन ; जयंत पाटलांसमोर उभा राहिला प्रश्न

शहर मध्य मतदार संघासाठी निर्माण झाला पेच

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील शहर मध्य मतदारसंघावरून आत्तापासूनच घामासान सुरू झाले आहे. शहर मध्य मतदार संघातून हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे आता लोकसभेत केल्याने त्यांच्या जागेवर कोण निवडणूक लढवणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्या अगोदरच आडम मास्तर यांनी शहर मध्यवर दावा करत पुढचा आमदारकीचा वारसदार मीच आहे असे म्हणत दंड थोपटले. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक पातळीवर देखील मोट बांधण्यास सुरुवात केली.

         दरम्यान मास्तर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या कार्यालयात शहर मध्य विधानसभा मतदार संघासाठी आम्हाला सहकार्य करावे ही भावना घेऊन बैठक घेतली असता त्या ठिकाणी माजी नगरसेवक तथा गत निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार राहिलेले तौफिक शेख यांनी शहर मध्य मतदारसंघावर दावा ठोकला. त्यातूनच शहर मध्य च्या जागेवरून घामासान सुरू झाले.

           सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्याच्या मेळावासाठी सोलापुरात दाखल झाले असता तौपिक शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत सुशील रसिक सभागृह दणाणून सोडले. शहर मध्य ची जागा आपल्यालाच मिळायला पाहिजे त्यासाठी माझे नाव सुचवा असा दबावच टाकला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अजून बराच कालावधी असताना सोलापूर शहरातील शहर मध्य मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्येच महाघामासान सुरू झालेले दिसत आहे. यावर जयंत पाटील यांनी तूर्तास तरी ठीक आहे असे म्हणत विषय मार्गी लावला आहे. वास्तविक पाहता शहर मध्य जागा काँग्रेस पक्षाची असून त्यावर काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी काय निर्णय घेते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदर येणाऱ्या काळात महाविकास आघाडी तसेच महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते शहर मध्य विधानसभा मतदारसंघ बाबत काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुस्लिम जमीयत कडून निवेदन सादर

मुस्लिम जमियत कडून निवेदन सादर 

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघाची जागा ही अल्पसंख्यांक मुस्लिम समाजासाठी सोडण्यात यावी. यासाठी जयंत पाटील यांना मौलाना यांच्या हस्ते मागण्याचे निवेदन देण्यात आले. यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि सदरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि अल्पसंख्यांक समाजासाठी सोडण्यात यावी असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

       

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *