स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशन तर्फे ५१ हजार स्वामी भक्तांना होणार लाडू वाटप 

स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे ५१ हजार भक्तांना होणार लाडू वाटप ; रविवारी स्वामी समर्थ मंदिरांमध्ये आयोजन

सोलापूर व्हिजन

सोलापूर ,दि.२० जुलै –  गुरुपौर्णिमेनिमित्त स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने रविवार दि.२१ जुलै रोजी जुळे सोलापूरसह दक्षिण सोलापुरातील गावांमधील विविध स्वामी समर्थ मंदिरांमध्ये भक्तांना ५१ हजार बेसन लाडूचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी दिली.

          सामाजिक शैक्षणिक सह विविध क्षेत्रात अल्पावधीतच एक वेगळा ठसा उमटविलेल्या स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात. याच अंतर्गत रविवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत दिवसभरात स्वामी समर्थांच्या मंदिरांमध्ये ५१ हजार बेसन लाडू वाटप उपक्रम घेण्यात येणार आहे. जुळे सोलापूर, हद्दवाढ भागासह दक्षिण सोलापुरातील विविध गावातील श्री स्वामी समर्थ मंदिरात भक्तांना ५१ हजार लाडू  वाटप  करण्यात येणार आहे. सुमारे २० मंदिरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहर – जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी केले आहे.

       दरम्यान फाउंडेशनच्या वतीने लवकरच  शेतकऱ्यांना ७ हजार  छत्र्या वाटप करण्यात येणार आहेत. १० हजार महिलांना पर्स देण्यात येणार आहेत. ५ हजार टी-शर्ट वाटपही करण्यात येणार आहे. युवक – युवती , विद्यार्थी, शेतकरी आणि महिलांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून पाठबळ आणि आधार देण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे , असे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *