सुशील कुमार शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर , दि. ५ सप्टेंबर – देशाचे माझी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेऊन सुशील कुमार शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो.
दरम्यान यंदाच्या वर्षीही हा वाढदिवस उपक्रमाने साजरा झाला. यावेळी काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष चेतन नरोटे , महाराष्ट्र कांग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सी. ए. सुशील बंदपट्टे व मित्र परिवाराच्या वतीने पुणे येथे सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोज यलगुलवार , माजी नगरसेवक विनोद भोसले , तिरुपती परकीपंडला अंबादास करगुळे राज सलगर आदींची उपस्थिती होती.