Suryakumar Yadav सुपर ओव्हर्समध्ये श्रीलंकेचा पराभव करत भारताने मालिका 3-0 मध्ये दमदार विजय

( Suryakumar Yadav ) कर्णधार सूर्य कुमार यादवने सुपर ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून जिंकवला सामना….

  • सोलापूर व्हिजन 

श्रीलंकेच्या फलंदाजांनी सुपर ओव्हरमध्ये भारताला 3 धावांचे लक्ष्य दिले होते. कर्णधार सूर्य कुमार यादवने सुपर ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून हा सामना जिंकला आहे. त्यामुळे सुपर ओव्हर्समध्ये श्रीलंकेचा पराभव करत भारताने मालिका 3 विरुद्ध 0 अशा फरकाने काबीज केली आहे. (suryakumar yadav contributed to the victory and india won the T20 series against sri lanka)

दोन्ही संघांनी निर्धारित 20 षटकात आपापल्या डावात 137 धावा केल्या होत्या. त्यामुळे निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हरचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुपर ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरने भारताकडून अप्रतिम गोलंदाजी करताना श्रीलंकेला फक्त २ धावांवर रोखण्यात यश आले. यानंतर भारतासाठी फलंदाजीला आलेल्या कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून सामन्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केला आहे. एकेकाळी श्रीलंकेला या सामन्यात विजयासाठी 30 चेंडूत 30 धावा करायच्या होत्या, पण भारताच्या डेथ ओव्हर्समध्ये रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि सूर्याने शानदार गोलंदाजी करत सामन्याला कलाटणी दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे श्रीलंकेचा पराभव करत भारताने या सामन्यामध्ये दमदार विजय मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *