सकाळच्या धगी नंतर संध्याकाळी उन्हात पडलेल्या पावसाचा सोलापूरकरांनी घेतला अनुभव……… थोडीशी उसंत घेतल्यानंतर मृगाने पुन्हा शहरात लावली हजेरी….

सोलापूर शहरात बरसला मृगाचा पाऊस…. थोडीशी उसंत घेतल्यानंतर पुन्हा शहरात लावली हजेरी…. सकाळच्या धगी नंतर संध्याकाळी उन्हात पडलेल्या पावसाचा सोलापूरकरांनी घेतला अनुभव…..

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दिनांक  :- गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहरात ऊन वारा आणि पाऊस असा खेळ सुरू आहे. सकाळी कडक ऊन दुपारी धग आणि संध्याकाळी आभाळ दाटून येऊन पाऊस असे त्रिवेणी  वातावरण सोलापूरकरांना अनुभवण्यात मिळत आहे. अनोखे वातावरण शहरात निर्माण झाले आहे. चक्क उन्हामध्ये पावसाच्या जलधारा बरसत असल्याचा अनुभव शहरवासीयांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घेतला. सकाळी कडक ऊन त्यानंतर ढगाळ वातावरण येऊन संध्याकाळी साडेपाच वाजता पावसाला सुरुवात झाली त्यानंतर सहा वाजता पुन्हा एकदा सूर्यनारायण बाहेर आला अशा अवस्थेमध्ये देखील पावसाच्या जलधारा कोसळत राहिल्या. या ऊन्हातील पावसाचा अनुभव शहरवासीयांनी घेतला. मुगाचा पाऊस शहर जिल्ह्यात सर्वप्रथम मोठ्या प्रमाणात झाला त्यानंतर पावसाने काही काळासाठी उसंत घेतली.

शहरात पुन्हा उन्हाळा असल्याचे भासू लागले. मात्र गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळत असल्याने सोलापूरकरांना सकाळी उन्हाळा आणि संध्याकाळी पावसाळा असे दोन्ही ऋतू अनुभवण्यास मिळत आहेत. मंगळवारी संध्याकाळी आभाळ भरुन न येताच अचानकपणे जलधारा कोसळल्यामुळे शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची रेनकोट न आणल्याने एकच धांदल उडाली. शेवटी त्यांना पावसातच भिजत घरी जाणे पसंत केले. संततधार पावसाने कामावरून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना देखील भिजवले……

विश्रांती घेऊन बरसला मृगाचा पाऊस…..

नक्षत्राच्या सुरुवातीलाच मृगाचा पाऊस जोरदार बरसला शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची दमदार हजेरी लागली त्यानंतर काही काळासाठी पावसाने विश्रांती घेतली. आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे सकाळी उन्ह आणि संध्याकाळी पावसाची हजेरी शहरात लागत आहे त्यामुळे सकाळी ऊन आणि संध्याकाळी पाऊस असा संगम शहरवासीय अनुभवत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *