राज्यसभेच्या खासदारपदी सुनेत्रा पवार यांची निवड : सोलापूर राष्ट्रवादी कार्यालयासमोर फटके उडून एकच जल्लोष साजरा : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चाणक्य नीतीची आली प्रचिती
लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर अजित दादा यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदार पदी वर्णी लागली आहे. अजित दादांच्या राजकारणातील डावपेच आणि चाणक्याच्या जोरावर त्यांना हे राज्यसभेचे पद मिळवता आला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयासमोर एकच जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान आदींसह पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून लाडू भरवून विविध घोषणा देत जल्लोष साजरा केल्याचे चित्र दिसून आले. तर महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदंडकर कार्याध्यक्ष चित्रा कदम आदींसह महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडीचा फेर धरत आनंद साजरा केला.
दरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना किसन जाधव आणि संतोष पवार यांनी अजित दादा पवार यांच्या राजकारणातील चाणक्यपनाचे कौतुक केले आणि भविष्यात विकास कामांची गंगा अहोरात्र सुरूच ठेवण्याचे आश्वासन दिले. एकंदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणातील चाणक्य नीतीचा अनुभव याप्रसंगी आला असून राज्यसभेचे पद मिळवण्यात राष्ट्रीय काँग्रेसला यश आल्याचे दिसून येत आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले बिज्जू प्रधाने किशोर पाटील आनंद मुस्तारे बसवराज कोळी वैभव गंगने आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.