आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महामंडळकडून झाले सज्ज : राज्यातून सुमारे 5000 एसटी बसेस धावणार पंढरपूरकडे ; वारीच्या नियंत्रणासाठी 2000 अधिकारी कर्मचारी नियुक्त…

सोलापूर दिनांक :- दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र श्रीपंढरपूर आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मांदियाळी पंढरपूरकडे येत असते. वारकरी आणि भाविक वर्गांना पंढरपूरकडे येण्यासाठी कोणताही त्रास आणि दळणवळणाच्या साधनांचा अभाव होऊ नये यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वतीने राज्यभरातून सुमारे 5 हजारहून अधिक एसटी बसेस पंढरपूरकडे धावणार आहेत. यासाठी एसटी प्रशासनाचे नियोजन सुरू केले आहे. पंढरपूर मधील विविध स्थानकावर वारकरी आणि इतर जिल्ह्यातून तसेच शहरातून आलेल्या भाविकांसाठी योग्य त्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत त्यासाठी वरिष्ठ स्तरावरून आढावा बैठक आणि पाहणी दौरा आयोजित करण्यात येत आहेत.
दरम्यान आषाढीवारी सुरळीत होण्यासाठी राज्यभरातील विविध एसटी विभाग आणि आगारातून ज्यादा बसेस पंढरपूरकडे सोडण्यात येणार आहेत. तसेच सोलापूर विभागाच्या मार्फत या वारीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. सदरची वारी यशस्वी करण्यासाठी महामंडळाच्या वतीने दोन हजार अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत. वारकरी आणि प्रवाशांना कोणताही असुविधा होऊ नये यासाठी महामंडळ आणि अधिकारी वर्ग प्रयत्नशील आहे अशी माहिती सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक विनोद कुमार भालेराव यांनी दिली आहे….
आषाढी वारीसाठी सोलापूर एसटी विभाग राहणार सज्ज….
# आषाढी वारीसाठी सोलापूर एसटी विभागामार्फत यात्रेच्या सर्व यंत्रणेवर नियोजन असणार…..
# सोलापूरसह जिल्ह्यातील विविध नऊ आगारांतून ज्यादा बसेस तसेच अधिकारी कर्मचारी तैनात केले जाणार…..
# राज्यातील विविध जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांसाठी संबंधित एसटी विभाग आणि आगारातून पाच हजार जादा एसटी बसेस सोडण्यात येणार……
# सोलापूर विभागातील अधिकारी कर्मचारी आषाढीवारी गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असणार…….
# पंढरपूर मधील विठ्ठल चंद्रभागा अशा विविध एसटी स्टँडवर अधिकारी कर्मचारी नियंत्रणासाठी नियुक्त केले जाणार….
# पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या विविध पालखी आणि पायी वारीमधील वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारे असुविधा होणार नाही यासाठी योग्य नियोजन असणार…..
आषाढीवारी संबंधी सर्व घडामोडींवर वरिष्ठ स्तरावरून तसेच मंत्रालयातून आढावा बैठक घेतली जाणार आहे त्यासाठी वेळोवेळी पाहणी दौरा निश्चित केला जाईल
विनोदकुमार भालेराव
( विभाग नियंत्रक सोलापूर एसटी विभाग )