रमाई आवास योजनेला होतो विलंब … आमदार देशमुख यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या या सक्त सूचना

रमाई आवास योजनेअंतर्गत दाखल अर्जाची त्वरित छाननी करून त्वरित निघाली काढा :- आ.विजयकुमार देशमुख

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१३ फेब्रुवारी

सोलापूर शहर आणि विशेष करून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील रमाई आवास योजनेचा लाभ मिळवा म्हणून लाभार्थ्याने पालिका प्रशासनाकडे रीतसर अर्ज केले आहेत तरीदेखील कागदपत्राची पूर्तता केली नाही असे कारण पुढे करत २८०० प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.

या प्रकरणासंदर्भात गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात रमाई आवास योजनेच्या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक नारायण बनसोडे, अजित गायकवाड, अजित गादेकर, गौतम कसबे, पिंटू डावरे, प्रमोद चंदनशिवे यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

         दरम्यान या योजनेतील सुमारे २८०० प्रकरणांपैकी केवळ ९८ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार माजी नगरसेवक प्रा नारायण बनसोडे यांनी यावेळी केली.

        रमाई आवास योजनेत २८० स्केअर फुट पेक्षा कमी जागा असणा-या  अर्जदारांनाही रमाई आवास योजनेचा लाभ द्यावा यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या , रमाई आवास योजनेतील सदर अट रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *