फलोत्पादन, रोजगार हमी कॅबिनेटमंत्री भरत शेठ गोगावले सोलापूर दौऱ्यावर
शासकीय आढावा बैठक व कार्यकर्त्याच्या गाठी भेटी सह पत्रकारांशी साधणार संवाद…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१८ एप्रिल
शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले १९ एप्रिल रोजी सोलापूर सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. श्रीसिद्धेश्वर एक्सप्रेस रेल्वेने सकाळी सात वाजता त्यांचे सोलापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल त्यानंतर ते सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे जातील सकाळी सात ते नऊ शासकीय विश्रामगृह येथे राखीव असून यावेळी ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत सकाळी दहा वाजता अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी रवाना होती सकाळी ११.०० वाजता महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन १२.०० वाजता सात रस्ता येथील शिवसेना भवन कार्यालयास सदिच्छा भेट व पत्रकारांशी संवाद १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आढावा बैठक दुपारी २ वाजता मोहोळ येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे ४.०० वाजता करमाळा येथे स्वातंत्र्यसैनिक उत्तर अधिकारी संघटनेचे प्रांतिक सदस्य ज्येष्ठ पत्रकार नरसिंह मनोहरपंत चिवटे यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळ्यास उपस्थित राहतील सत्कार सोहळा झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता करमाळ्याची ग्रामदैवत कमला भवानी देवीचे दर्शन घेतील सायंकाळी ७ वाजता कुर्डूवाडी करमाळा रोडवर स्नेहभोजन व कुर्डूवाडी च्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील रात्री ९.०० वाजता कुर्डूवाडी येथे बैठक व रात्री १०.०० वाजता शासकीय विश्रामगृह कुर्डूवाडी येथे आगमन व राखीव रात्री ११.०० वाजता सिद्धेश्वर एक्सप्रेस ने मुंबईकडे प्रस्थान करतील