श्रीसिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्ण ; उद्या होणार उद्घाटन !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि.२० डिसेंबर
श्री सिद्धेश्वर देवस्थान यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवता असून यंदा प्रदर्शनाचे ५४ वे वर्षे आहे. या निमित्ताने होम मैदान येथे दी. २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२४ या ५ दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शनात ३०० स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे.
यासंबंधी कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. भव्यदिव्य असे सभामंडप उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या होणार असून, त्या अनुषंगाने सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी आणि स्मार्ट एक्सपो यांच्या वतीने सर्व जय्यत तयारी करण्यात आल्याचे कृषी प्रदर्शनाचे चेअरमन गुरुराज माळगे यांनी सांगितले.
दरम्यान, कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद सोलापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्याने व स्मार्ट एक्स्पो ग्रुप च्या व्यवस्थापन अंतर्गत भरविण्यात येत आहे. तसेच कृषी संशोधन केंद्र, सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र. रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर व मोहोळ विभाग, रेशीम खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन, सामाजिक वनीकरण व राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड, कृषी महाविद्यालय, कृषी स्टार्टअप उद्योजक, नया उद्योजक, कृषी यांत्रिकीकरण फळ रोपवाटिकाधारक, साखर कारखाने यांच्या सहभागाने आयोजित केले जाणार आहेत.